उज्जैनकर फाउंडेशनचे सन 2023/24 चे तापी- पूर्णा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

Bharari News
0
आळंदी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर
             29 सप्टेंबरला फाउंडेशनच्या 15 व्या वर्धापन दिनानिमित्त मुक्ताईनगर येथे होणार मान्यवरांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण सोहळा
              शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जिल्हा जळगाव तर्फे दरवर्षी तापी- पूर्णा राज्यस्तरीय साहित्य व इतर पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केले जातात साहित्य पुरस्कार फाउंडेशनच्या आयोजित साहित्य संमेलनामध्ये प्रदान केले जातात त्याचप्रमाणे फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त तापी- पूर्णा राज्यस्तरीय आदर्श प्राचार्य / आदर्श मुख्याध्यापक, आदर्श शिक्षक, आदर्श पत्रकारिता, आदर्श समाजसेवा पुरस्कार प्रदान केले जातात फाउंडेशनचा 15 वा वर्धापन दिन सप्टेंबर महिन्या मध्ये आयोजित करण्यात आलेला आहे प्रसंगी तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा सुद्धा आयोजित करण्यात आलेला आहे,
             याप्रसंगी हे पुरस्कार उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानाने प्रदान केले जातील. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी सन २०२३.२४ चे पुरस्कार पुढीप्रमाणे नुकतेच जाहीर केले.
*तापी-पूर्णा राज्यस्तरीय आदर्श प्राचार्य / मुख्याध्यापक पुरस्कार* जे. ई. स्कूल व ज्युनिअर कॉलेज, मुक्ताईनगरचे प्राचार्य आर. पी. पाटील, नवीन माध्यमिक विद्यालय, पारंबी येथील मुख्याध्यापक एस. डी. ठाकूर नवीन माध्यमिक विद्यालय, सुकळीचे मुख्याध्यापक पी.पी. दाणे चांगदेव विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय श्रीराम चौधरी अल्फलाह उर्दू हायस्कूल मुक्ताईनगरचे मुख्याध्यापक शाह इकबाल शाह ईसा, श्री सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, देऊळगाव साकरशा ता. मेहकर जि. बुलढाणा येथील प्राचार्य अशोक नारायण खोरखेडे प्राथ. मराठी शाळा खेडी भोकरी ता. चोपडा येथील मुख्याध्यापक भास्कर शंकरराव पाटील
               *तापी पूर्णा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार* जी.वी. मेहता नवयुग विद्यालय, खामगाव येथील शंकरराव प्रल्हाद अनासुने ए.के.नॅशनल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज खामगावचे पर्यवेक्षक डॉ. प्रविण क्षिरसागर, प्रा. डॉ. संदीप गोसावी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय त्रंबकेश्वर जि. नाशिक अल्फलाह उर्दु हायस्कूल मुक्ताईनगरचे शे. लियाकत शे.कयूम, शिवाजी हायस्कूल, वडोदा येथील शिक्षक संतोष जनार्दन उगले, शिवाजी हायस्कूल कु-हा- काकोडाचे पर्यवेक्षक हेमंत सुधाकर देशपांडे स्व. अशोक फडके माध्यमिक विद्यालय कु-हा- काकोडाचे शिक्षक पी.एम. घोगरे ज्ञानपूर्णा विद्यालय, निमखेडी बु येथील श्री महेंद्र देवराम तायडे, प्राथ. मराठी शाळा निमखेडी बुचे सुधीर देविदास मांजरे संत मुक्ताबाई जुनिअर कॉलेज येथील प्रा. एस. एस. गड्डम, जि. प. प्राथमीक मराठी शाळा, शेमळदा येथील सौ. छाया प्रमोद पिवटे, जि. प. मराठी मुलांची शाळा निमखेडी खुर्द येथील सौ. जयश्री नितीन भोंबे तु.ल. कोळंबे प्राथ. विद्यालय, मुक्ताईनगर येथील श्रीमती आशा हरिश्चंद्र कोळी, कै. गणपतराव खडसे आश्रम शाळा कोथळी येथील राजेन्द्र विठ्ठल पारधी, जे. ई. स्कूल मुक्ताईनगर येथील शिक्षक संजय रघुनाथ ठाकूर, संत मुक्ताबाई माध्यमिक विद्यालय, मुक्ताईनगरचे शिक्षक सुभाष सुखदेव गायकवाड अंतुर्ली एम. एफ. तराळ विद्यालयाचे सुनील काशिनाथ काळे, शारदा माध्यमिक विद्यालय न्हावी ता. यावल प्रवीण मधुकर वारके, गजानन महाराज विद्यालय, कुरणखेडा ता. जि. अकोला येथील शिक्षक संतोष एकनाथ सुरवाडे, जोंधनखेडा आश्रम शाळेचे संतोष भास्करराव पाटील, जि. प. मराठी मुलांची शाळा, पारंबी मंगेश काशिनाथ ढेंगे, आश्रम शाळा कर्जाने ता. चोपडा येथील किरण रघुनाथ पाटील जि. प. मराठी शाळा सातोड ता.मुक्ताईनगर येथील दिलीप जगन्नाथ पाटील जि. प. मराठी मुलांची शाळा चांगदेव ता. मुक्ताईनगर येथील काशीराम महादेव चिम जि.प. मराठी शाळा नवनाथ नगर वडोदा ता. मुक्ताईनगर येथील अशोक गोवर्धन शिंदे पुष्पावती खुशाल गुळवे मुलींचे विद्यालय, जळगाव येथील सौ.कांचन मुकेश पाटील प्रा.स्वामी विवेकानंद सीनियर कॉलेज मंठा जि. जालना येथील प्रा.डॉ.भरत कारभारी धोत्रे, डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय, जळगाव येथील प्रा. गजानन हरी वंजारी स्व. अशोक फडके माध्य. विद्यालय कु-हा काकोडा येथील सौ. उर्वशी महेंद्र चौधरी जि. प. प्राथमीक शाळा जोगलखोरी ता. भुसावळ येथील दीपक प्रल्हाद पाटील एम. एफ. तराळ विद्यालय, अंतुर्ली येथील चंद्रकांत नामदेव पाटील आदी शिक्षकांना तापी- पूर्णा राज्यस्तरीय आदर्श प्राचार्य/ मुख्याध्यापक / आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले.
           त्यासोबतच *तापी- पूर्णा राज्यस्तरीय आदर्श समाजसेवा पुरस्कार* पुढील प्रमाणे जाहिर करण्यात आले विलास सिंदगीकर केकत सिंदगी ता. जळकोट जि. लातूर पांडुरंग दैवज्ञ, खामगाव,शाहीर मनोहर पवार चिखली- मेहकर, एडवोकेट सर्जेराव साळवे छत्रपती संभाजीनगर , श्रीराम उज्जैनकर, बुलढाणा, दीपक उखर्डू वाल्हे, अमळनेर, केळवद ता. चिखली येथील शाहीर मनोहर पवार हिवरा आश्रम जि. बुलढाणा येथील सर्प मित्र वनिता जगदेव बोराडे अकोला येथील डॉ. मनोहर घुगे आदी मान्यवरांना तापी - पूर्णा राज्यस्तरीय आदर्श समाजसेवा पुरस्कार जाहीर करण्यात आले. तर *तापी- पूर्णा राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार* पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आले ललितकुमार फिरके, न्हावी ता. यावल प्रा. विनायक वाडेकर, मुक्ताईनगर श्री राजु सखाराम वाढे , एम.सी.एन. न्यूज चॅनल, जळगाव जामोद , 
             दैनिक हिंदू सम्राट तथा स्वराज्य वार्ता यूट्यूब चैनलचे किरण पाटील, अंतुर्ली अजय भामरे, साप्ताहिक लेखन मंच, अमळनेर आदी पुरस्कार याप्रसंगी डॉ. उज्जैनकर यांनी एकूण 51 पुरस्कार जाहीर केले. सर्व पुरस्कारार्थिना 29 सप्टेंबर 2024 रोज रविवारला आयोजित फाउंडेशनच्या 15 व्या वर्धापन दिनानिमित्त मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानाने प्रदान केले जातील या पुरस्काराचे स्वरूप प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व गुलाब पुष्प असे असेल सर्व पुरस्कारार्थींचे शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन तर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!