सुनील भंडारे पाटील
पाच हजार रुपये लाचेची मागणी करून प्रत्यक्ष अडीच हजार रुपये लाच घेताना दिघी पुणे येथील महा ई सेवा केंद्रातील दोन जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांनी रंगेहात पकडले आहे, या दोघांवर दिघी पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड पुणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
पोलीस स्टेशनला दिलेल्या माहितीनुसार भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन 1988 कायदेशीर कलम अन्वये संतोष बबन वाळके वय 48 गुरुदेव दत्त महा ई सेवा केंद्र चालक दिघी पुणे तसेच श्रीमती नंदा राजू शिवरकर वय 36 वर्ष पद कॉम्प्युटर ऑपरेटर गुरुदेव दत्त महा ई सेवा केंद्र दिघी पुणे यांना लाच मागनि तसेच स्वीकारले प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे,
यातील तक्रारदार हे उत्पन्नाचा दाखला व डोमेसाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी गुरुदेव दत्त महा ई सेवा केंद्र दिघी पुणे येथे गेले असता संतोष वाळके व नंदा शिवरकर यांनी आमची तहसीलदार कार्यालयात ओळख असून हे काम करून देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांना प्राप्त झाली होती,
सदर तक्रारीची पडताळणी केली असता वाळके व शिवरकर या दोघांनी पाच हजार रुपये लाचेची मागणी करून प्रत्यक्ष दर्शनी पंचां समोर अडीच हजार रुपये लाच स्वीकारताना अँटी करप्शन ब्युरो यांनी रंग हात पकडून ताब्यात घेतले व या दोघांविरुद्ध दिघी पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड पुणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
सदरची कारवाई पोलीस उपायुक्त/पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर शितल जानवे यांचे मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांनी केली आहे,