ग्रामपंचायत मध्ये सत्ता बदलली की चांगल्या योजना बासणात गुंडाळी जाते याचे उत्तम उदाहरण म्हणजे लोणी काळभोर येथील जॉगिंग ट्रॅक व स्मशानभूमी जवळील पाणी फिल्टरेशनचा प्लांट . लोणी काळभोर येथे मागील पंचवार्षिक मध्ये प्रशांत काळभोर यांची सत्ता असताना सरपंच वंदना ताई काळभोर यांनी लोणी काळभोर ग्रामस्थांसाठी 14 लाख रुपये खर्च करून जॉगिंग ट्रॅक ची चांगली योजना अमलात आणून ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला उद्घाटन करण्याच्या आगोदर सत्ता बदलली .महादेव मंदिराजवळील ओढ्याच्या कडेला असलेल्या या जॉगिंग ट्रॅक ला दोन्ही बाजूला कमान करून व तेथे गेट लावून हवेली तालुक्यात जॉगिंग साठी पहिला ट्रँक लोणी काळभोरला उभारण्याचा मान मिळाला .परंतु प्रशांत काळभोर यांची सत्ता जाताच आत्ताच्या सत्ताधाऱ्यांनी तो जॉगिंग ट्रॅक तोडून कमान फोडून व तेथील गट्टू काढून टाकले याविषयी ग्रामसेवक एस गवारी यांना विचारले असता त्यांनी जॉगिंग ट्रॅक दुरुस्त करायचा असून त्यासाठी कमान तोडून गट्टू काढून टाकले असल्याची माहिती दिली .पण जॉगिंग ट्रॅक चालू व्हायच्या आधीच परत दुरुस्तीसाठी पैसे खर्च का करायचे असा प्रश्न लोणी काळभोर मधील नागरिकांना पडला आहे ,
एकीकडे जॉगिंग ट्रॅक साठी टाकलेले गट्टू काढायचे तर दुसरीकडे जुन्या अंबरनाथ मंदिर ते खोकलाईदेवी चौक येथील सिमेंट काँक्रिटीकरण केलेला रस्त्याच्या कडेला साईट पट्ट्या गट्टू शिवाय तशाच आहेत मग एवढी चांगली योजना भाषणात गुंडाळायची काय कारण असे नागरिकांनी प्रश्न विचारले आहेत तर स्मशानभूमी जवळील पाणी फिल्टरेशन प्लांट कोट्यावधी रुपये खर्चून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते उद्घाटन होऊन सुद्धा वर्षानुवर्ष अपूर्ण अवस्थेत आहे .हे दोन्हीही प्लांट लोणी काळभोर गावाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असून हवेली तालुक्यातील पहिले प्लांट होण्याचा मान मिळाला असला तरी तो भाषणात गुंडाळण्याचे काम चालू आहे .