यवत प्रतिनिधी
आजच्या धक्का धक्किच्या युगात "रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा" हे वाक्य अनेक ठिकाणी डॉक्टरांनी चांगल्या प्रकारे अमलात आणलेले आहे, रुग्णांना चांगल्या सेवा प्रदान करण्यासाठी अनेक प्रयत्न प्रत्येक हॉस्पिटल मध्ये केले जातात. तसेच काही शासनाच्या आरोग्य विषयक स्कीम (योजना) अनेक हॉस्पिटल मध्ये राबवल्या जातात परंतू याची कल्पना सामान्य नागरीकांना नसते, आणि हॉस्पिटल मध्ये काही क्रिटिकल ऑपरेशन तसेच अनेक आजारांसाठी नागरीकांना बिल भरावे लागते.
रुग्ण सेवा कोणत्या ना कोणत्या माध्यमातून घडणे खूप गरजेच आहे, याच साठी अनेक ठिकाणी आरोग्य शिबीर तसेच मोफत गोळ्या औषध वाटप, अल्प दरात उपचार असे हॉस्पिटल करतात. असेच एक कोलवडीतील डॉक्टर ऋषिकेश गायकवाड रुग्णांची प्रामाणिक सेवा करतात, त्यांनी अनेक रूग्णांना अल्प दरात मोठया मोठया सर्जरी,ऑपरेशन करुण देऊन सामन्य नागरीकांना खूप मोलाचे सहकार्य केले आहे, याच कामाची पोच पावती त्यांना भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी पुणे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून गौरवण्यात आले आणि नियुक्ती देखील झालेली आहे. भविष्यात डॉक्टर ऋषिकेश गायकवाड यांच्या हातून अशीच काही चांगली कामे आणि रुग्ण सेवा घडावी अशी कोलवडी परिसरातील नागरिकांनी यावेळी बोलताना सांगितले.
कोलवडी गावचे सुपुत्र डॉक्टर ऋषिकेश शरद गायकवाड यांची भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली डॉक्टर ऋषिकेश गायकवाड यांच्या अनेक पिढ्यांचा सेवा करण्याचा वारसा जपत आहेत,अनेक योजना गोरगरिबांसाठी आतापर्यंत राबवल्या आहेत अनेकांच्या शस्त्रक्रिया त्यांनी अल्प दरात करून दिल्या आहेत त्याशिवाय गरिबांना त्यांच्या हॉस्पिटल मध्ये मोफत उपचार तसेच इमर्जन्सी रुग्णांना सेवा, तसेच मोठ्या हॉस्पिटलमध्ये अल्प दरात उपचार अशा विविध कामांची नोंद घेत 4 सप्टेंबर 2024 रोजी त्यांना माजी मंत्री पंकजा ताई मुंडे यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवडीचे पत्र देण्यात आले त्यावेळेस श्री.शरद गायकवाड,श्री.प्रदीप दादा कंद , श्री.रामभाऊ दाभाडे , श्री.संदीप आप्पा भोंडवे आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्व मान्यवरांनी डॉक्टर ऋषिकेश गायकवाड यांना पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा दिल्या, या वेळी बोलताना डॉक्टर ऋषिकेश गायकवाड यांनी सांगितले की इथून पुढे निस्वार्थीपणे आणि प्रामाणिकपणे रुग्णांची सेवा माझ्या हातून घडेल आणि गरीब रुग्णांना काही आरोग्य विषयक समस्या असतील तर त्यांनी नी संकोच पणे मला फोन व्दारे किंवा प्रत्यक्षात भेटून आपल्या समस्या मांडाव्यात माझ्याकडून सर्वांना योग्य ती मदत होईल असे यावेळी डॉक्टर ऋषिकेश गायकवाड यांनी स्पष्ट केले.यावेळी बोलताना डॉक्टर ऋषिकेश गायकवाड यांनी रुग्णांसाठी आपला हेल्पलाइन नंबर दिला आहे. ७२१८६८२७६८ या नंबर वर रुग्ण २४/७ केव्हाही कॉल करू शकतात आणि काही मेडिकल इमर्जन्सी असल्यास रुग्णांना मोफत रुग्णवाहिका देखील उपलब्ध करून देऊ असे ही त्यांनी या वेळी बोलताना सांगितले.