शिक्षक दिन औचित्य साधून ग्रामपंचायत वाडा पुनर्वसन कोरेगाव भीमा (तालुका शिरूर) व अलमदिना फाउंडेशन अभिनव आरोग्य प्रतिष्ठान, वाघोली यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले.
सदर आरोग्य शिबिरामध्ये हिमोग्लोबिन तपासणी, मणक्यांची तपासणी, त्याचबरोबर विविध प्रकारच्या थेरेपी रुग्णांना मोफत देण्यात आल्या, त्यावर काही औषधे देखील सवलतीच्या दारात प्रतिष्ठान मार्फत देण्यात आले.... यावेळेस सरपंच योगिता नितीन ढोरे, उपसरपंच संपत माळी, सदस्य वसंत भोकटे, त्याचबरोबर अल्मदिना फाउंडेशनच्या अध्यक्षा अफसाना शेख, उपाध्यक्ष मशाक शेख, सचिव सादिक मिया माशाळकर, जेबा शेख, पल्लवी आदमाने, प्रगती मोहन कांबळे इत्यादींनी शिबीर यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले. रुग्णांनी देखील तपासणी झाल्यानंतर समाधान व्यक्त केले,