इंदापूर प्रतिनिधी गौतम पिसे
कै.सौ.ल.रा. शिंदे हायस्कुल अर्णेश्वर (पुणे)
विद्यार्थ्यांना शाळेचा गणवेश, बूट,वह्या,पेन,पेन्सिल, अशा शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले
शाळेच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले, कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, कै. लक्ष्मीबाई शिंदे, व कै. कमलाबाई सूर्यवंशी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले,
कार्यक्रमाचे अध्यक्ष गोगावले विकास विठोबा ऑनररी जॉईन सेक्रेटरी श्री शिवाजी मराठा सोसायटी पुणे तर प्रमुख पाहुणे माजी विद्यार्थी संघटना LRSH मैत्री फाउंडेशन ट्रस्ट चे अध्यक्ष तथा सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराचे अध्यक्ष मा जयदेव आहिलू इसवे, शरद पंढरीनाथ यादव माजी सहाय्यक प्रशासकीय अधिकारी पुणे मनपा, सभासद रविकांत भोसले, सभासद बजरंग गायकवाड, संजय शिंदे अध्यक्ष रोटरी क्लब सारसबाग, रोटरी क्लबच्या समाजसेविका. जयाताई देशपांडे, माजी मुख्याध्यापिका खानविलकर मॅडम, दादासाहेब काकडे सर यांची विषेश उपस्थिती होती,
कार्यक्रम प्रसंगी सर्व मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करताना विद्यार्थ्यांची शारिरीक मानसिक वैचारिक क्षमता कशी वाढवता येईल यावर मार्गदर्शन केले, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात प्रोहत्सान देऊन उत्तम दर्जाचे खेळाडू तयार करण्यासाठी प्रयत्न करण्यावर भर देण्यात यावा यासाठी प्रयत्न करण्यात येईल त्याच प्रमाणे शैक्षणिक गुणवत्ता वाढिवर विशेष लक्ष दिले जाईल असा विश्वास उपस्थित पालकांना देण्यात आला, भविष्यात शाळेचा नाव लौकिक वाढवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न माजी विद्यार्थी संघटना LRSH मैत्री फाउंडेशन च्या माध्यमातून करण्यात येतील असे सांगितले,
कार्यक्रमाला विध्यार्थ्यांच्या पालकांची उपस्थिती उल्लेखनिय होती, कार्यक्रमाचे आयोजन LRSH च्या मुख्याध्यापिका वैशाली वांद्रे मॅडम यांनी केले, प्रस्तावना वाशीलकर सरांनी केली, सूत्रसंचालन आरती गोगावले मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन माजी मुख्याध्यापिका सौ उमा कांबळे मॅडम यांनी केले, इतर सर्व शिक्षक व स्टाफ ने कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.
सामाजिक न्याय विभागाचे उपाध्यक्ष रघुनाथ भिसे, निरीक्षक गौतम पिसे, सरचिटणीस श्रीमती पूनम सोनावणे,विधानसभा अध्यक्ष कोथरूड अमित तुरूकमारे, हडपसर वामन धाडवे, कार्याध्यक्ष नामदेव उपाडे, काँटोंमेंट अतुल जाधव, कसबा शुभम शिंदे, पर्वती कुमार खंडागळे, खडकवासला प्रविण भोसले, छ.शिवाजी नगर युवराज जेठीथोर, संघटक सचिव अविनाश येणपुरे,सचिव राजू गुडेकर, प्रा अशोक नाळे, उपाध्यक्ष नितीन कडू, विनायक जाधव, प्रकाश वैराळ, विक्रम मोरे, निलेश गायकवाड, मिनाक्षी ताई कांबळे, सुनील गायकवाड, उपस्थित होते