सुनील भंडारे पाटील
पुणे नगर महामार्गावर पेरणे (तालुका हवेली) येथील टोलनाक्यालगत अदानी इंटरनेट कंपनीच्या केबल टाकण्याचे काम अवैधरित्या चालू असून खोल उकरण्यात आलेल्या चारीमुळे तसेच रस्त्यावरील टाकण्यात आलेल्या मातीमुळे अपघात होण्याची शक्यता आहे याकडे मात्र पुणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे निदर्शनास येत आहे,
महामार्गावर सततच्या वाहतूक कोंडीमुळे गर्दी तसेच वाहनांचा अतिवेग यामुळे लोकांना अगोदरच नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे त्यात आता संबंधित कामाच्या ठेकेदाराने दिलेल्या माहितीनुसार आदानी इंटरनेट केबलच्या रस्त्यालगतच्या जेसीबी द्वारे चाललेल्या खोदकामामुळे खूप मोठी खोल चारी तयार झाली आहे, तसेच या खोदकामाची माती रस्त्यावर टाकल्याने अपघात होण्याची शक्यता आहे तसेच कोरेगाव भीमाच्या बाजूने काम पूर्ण झाले असून आमचे काम तातडीने पूर्ण करून आम्ही निघून जाणार आहोत असे कामगारांनी सांगितले याचा अर्थ काम उरकून ठेकेदार पळून जाण्याच्या मार्गात आहे, शिवाय महामार्गाच्या साईड पट्ट्यांचे खूप मोठे नुकसान झालेले आहे याकडे मात्र पुणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे निदर्शनास येत आहे, ठेकेदाराचे प्रतिनिधी यांच्याकडे परवानगीची मागणी केली असता नकार मिळाला,
पुणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी राहुल कदम यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, संबंधित ठेकेदाराला काम बंद करण्याचे सांगितले असून साईड पट्ट्यांची दुरुस्ती करण्यास सांगितले आहे,