यवत पोलिसांची धडाकेबाज कामगिरी,लाखो रुपयांचे अमली पदार्थ जप्त

Bharari News
0
यवत प्रतिनिधी
           आरोग्यास अपायकारक असलेला गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू गुटखा यवत पोलिसांनी हस्तगत केला .....
                 यवत पोलीस स्टेशन च्या हद्दीतील वरवंड गावाच्या परिसरात यवत पोलिसांनी एका बंद खोलीत छापा टाकला. या छाप्यात आरोग्यास अपायकारक असलेला गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू असा ११ लाख २ हजार रुपये किंमतीचा गुटखा पोलिसांनी हस्तगत केला आहे. ही कारवाई वरवंड गावच्या हद्दीतील रेवणनाथ गोसावी यांच्या घराशेजारी रविवारी (दि. १५) रात्री १ च्या सुमारास केली.
        याबाबत पोलीस हवालदार रविंद्र रामदास गोसावी यांनी यवत पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. त्यावरून रेवणनाथ हरीभाऊ गोसावी (रा. वरवंड, ता. दौंड, जि. पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
      पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरवंड गावच्या हद्दीतील रेवणनाथ गोसावी यांच्या घराशेजारी एका बंद खोलीत यवत पोलिसांनी छापा टाकत आरोग्यास अपायकारक असलेला, शासनाची बंदी असलेला गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू असा एकूण ११ लाख २ हजार ६४० रुपये किंमतीचा विक्रीस बंदी असलेला बेकायदेशीरपणे साठवणूक केलेला गुटखा हस्तगत केला. याबाबत रेवणनाथऊ गोसावी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सपांगे हे करीत आहेत.
          ही कारवाई यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय कोल्हे, उत्तम कांबळे, पोलीस हवालदर रविंद्र गोसावी, गुरुनाथ गायकवाड, हिरालाल खोमणे, पोलीस नाईक निखील रणदिवे, पोलीस अंमलदर शुभम मुळे, दत्तात्रय टकले, मोहन भानवसे, महिला अंमलदार हेमलता भोंगळे, प्रतीक्षा हांडगे यांनी केली.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!