वन्यजीव प्राणी संरक्षण कायदा रद्द करावा शेतकरी संघटनेची मागणी
जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी या वाडीगावा मध्ये राजू शिंदे यांच्या वीट भट्टीवर कामात आलेल्या जाधव कुटुंबातील नववर्षीय रुपेश जाधव हा सकाळी वीट भट्टीवर राहण्यासाठी बांधलेल्या झोपडीतून बाहेर आला असता शेजारीच सोयाबीनच्या शेतात दडून बसलेल्या बिबट्याने त्यावर हल्ला केला आणि शेजारील उसामध्ये घेऊन गेला आजूबाजूच्या लोकांनी आरडाओरडा केला असता बिबट्या त्याच ठिकाणी या बालकाला सोडून पळाला परंतु डोक्याला फार मोठ्या प्रमाणात जखमा असल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
त्यानंतर घटनास्थळी अनेक राजकीय आणि सामाजिक संस्थांनी भेटी देऊन कुटुंबांचे सांत्वन केले परंतु यावर काही ठोस उपाय म्हणून वन विभागाने कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नसून हा मुलगा सर्वसामान्य कुटुंबातील असल्यामुळे वन विभागाला आज ते सोयीस्कर वाटले असले तरी भविष्यात याच घटनेचा उद्रेक होणार नाही याची वन विभागाने काळजी घ्यावी आणि वनविभागाने भयभीत झालेल्या नागरिकांना त्यांच्या संरक्षणासाठी आवाजाचे बंदूक बॅटरी आणि काठी याचे वाटप करावे अशी सर्वसामान्य जनतेची मागणी आहे. त्याचप्रमाणे वन्यजीव प्राणी संरक्षण कायदा रद्द करावा आणि वन्यजीव प्राण्यांपासून नागरिकांचे संरक्षण हा कायदा पारित करावा ही शेतकरी संघटनेची मागणी असून शासनाने त्यावर योग्य ते विचार करावा आणि सर्व सामान्य नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे,