निपाणी प्रतिनिधी सागर श्रीखंडे
नवणीहाळ नाईगल्ज रोडवर बुलोरो पिकअप मध्ये दाटी वटीने बेकादेशीर रीत्या बैल भरून थांबलेली गाडी दिसली यावेळी एका जग्रुत गोभक्त यांनी निपाणी येथील गोरक्षण सेवा समीती निपाणी यांच्या कार्यकर्ते यांना ही माहीती दिली यावेळी सांगली येथील मानद पशुकल्याण अधिकारी अंकुश गोडसे आणी गोरक्षण सेवा समीती निपाणी चे सागर श्रीखंडे यांनी 112 हेल्प लाईन ला कॉल करून गाडी पोलीस च्या स्वाधीन केली यावेळी पोलिसांनी चौकशी करून गाडी खडकलाट पोलीस स्टेशनाला आणण्यात आली सदरील महिंद्रा बोलेरो पिकप क्रमांक KA-23-A-9397 या वाहनावर प्राणी संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
यावेळी खडकलाट पोलीस स्टेशनच्या मदतीने मानद पशुकल्याण अधिकारी अंकुश गोडसे गोसेवा, समीती निपाणी चे सागर श्रीखंडे, विश्व हिंदू परिषदांचे दीपक भडगावे, राष्ट्रीय स्वयंम सेवक संघाचे विक्रम पाटील यांनी गौवंश श्री विरूपाक्षलिंग समाधी मठ गोशाळे मध्ये वेवस्तित पोहच केले, यावेळी मानद पशुकल्याण अधिकारी अंकुश गोडसे यांनी सांगितले की गोमाता आणी गौवंश यांची मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररीत्या हत्या देशभर होत आहे जर असेच राहिले तर भविष्यात गोमाता आणी गौवंश हा येणाऱ्या पिढीला चित्रात दाखवावे लागेल असे चिंता व्यक्त केली व आशी देशभररात कुठे ही गोमाता किंवा गौवंश ची बेकायदेशीर वाहतूक किंवा हत्या होत असेल तर पोलिसांशी,गौरक्षक,गोसंवर्धन यांच्याशी संपर्क करावे असे आवाहन अंकुश गोडसे यांनी केले. यावेळी गोसेवा समीती निपाणीचे युवराज पाटील,नंदेश सदलगे, विनायक खवरे,आजीत पाटील,विक्रम जाधव,संजय कोलकर, रोहित पाटील, सतीश पाटील, प्रसन्न कुलकर्णी,रोहित शिंदे, अतुल हजारे, शुभम पटेल, पार्थ शितोळे,प्रथम महाजन, दर्शन मोरे,प्रथम चन्दुलकर, यांचे गोवंश वाचवण्यासाठी विशेष सहकार्य लाभले,