धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान भूमी असलेल्या श्री क्षेत्र वढू बुद्रुक (तालुका शिरूर) येथे यावर्षी दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, मागील आठवड्यामध्ये युवा उद्योजक प्रफुल शिवले यांच्या शिवछावा प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या नृत्याचा भारदार कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
यावेळी आमदारकीसाठी इच्छुक असलेले पुणे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष प्रदीप कंद, ज्ञानेश्वर कटके हे उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या ,तर श्री धर्मवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून देखील दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रसिद्ध नृत्यांगना राधा पाटील मुंबईकर यांच्या नृत्यांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता,
दोन्ही कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला होता, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शिक्रापूर पोलिसांच्या वतीने चोख कडा पहारा ठेवण्यात आला होता,