सुनील भंडारे पाटील
पुणे सोलापूर रस्त्यावरील सोरतापवाडी नायगाव,उरळी कांचन परिसरामध्ये काही पतसंस्थांच्या कारभाराला नागरिक वैतागले असून पतसंस्थांच्या जाचाचा तसेच कर्जावरील अति व्याजदराचा सर्वसामान्य नागरिकांना चांगलाच फटका बसत आहे, स्वतः च्या फायद्यासाठी लोकांच्या जीवाशी खेळ चालला आहे,
राज्य शासनाने तसेच केंद्र शासनाने खाजगी पतसंस्थावर कडक नियंत्रण आणण्याची गरज आहे, शासनाने सहकार फेडरेशन नेमुन उलट कर्जदार खातेदारांच्या अडचणीत वाढ केली आहे, फेडरेशनच्या अडून अमर्यादित रक्कम वसूल करण्याकडे संस्थेच्या अध्यक्ष तसेच संचालकांचा कल असल्याने, याला खाजगी सावकारी म्हणावी लागेल अशी जनतेमध्ये चर्चा आहे, पेपर कमी असतील तरी चालेल फक्त तारण द्या आम्ही पाहिजे तेवढे कर्ज देऊ, यांचा फक्त कर्जदारांच्या प्रॉपर्टीवर डोळा, कर्जदार कर्ज भरून कधी थकतोय व त्याची प्रॉपर्टी मातीमोल किमतीत कशी हडप करता येईल याकडे या लबाडांचे लक्ष आहे,
' गरजवंताला अक्कल नसते 'या म्हणीप्रमाणे कर्ज घेताना पुढील संभाव्य धोका लोकांना माहिती नसतो , तातडीचे हॉस्पिटल, मोठी आर्थिक फसवणूक यामुळे हप्ते वळेवर न गेल्याने अशा लोकांना संबंधित संस्थांकडून असह्य त्रास दिल्याच्या हजारो घटना समाजात आहेत, त्यामुळे आता लोकांनीच स्वतः मध्ये सुधारणा करून घेण्याची गरज आहे, लबाडांची घरे भरण्यापेक्षा राष्ट्रीयकृत बँका तसेच आंतरराष्ट्रीय कृत बँकांकडे वळण्याची गरज आहे, म्हणजे अशा स्वरूपाचे संभाव्य धोके तयार होणार नाहीत अशा स्वरूपाच्या चर्चेला हवेली तालुक्याच्या पूर्वपट्यात उधान आले आहे,