सुनील भंडारे पाटील
शिक्रापूर (तालुका शिरूर) येथे एका तीन वर्षांच्या लहान मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समजल्यानंतर परिसरामध्ये तणावाचे वातावरण तयार झाले होते, या चिमुरडीला न्याय मिळवून देण्यासाठी अनेक संघटनांनी निवेदन दिली, त्याचप्रमाणे स्वराज्य सेनेच्या वतीने देखील आरोपीवर कठोर कारवाई करण्यासाठी निवेदन देण्यात आले,
शिरूर तालुक्यामध्ये अशा घटना घडणे म्हणजे माणुसकीला काळिंबा फासणाऱ्या घटना आहेत तालुक्यामध्ये अनेक महत्त्वाची धार्मिक स्थळे आहेत, मागील अनेक वर्षांमध्ये या भागातील वातावरण अतिशय चांगले होते, परंतु अलीकडच्या काळात काही वाईट प्रवृत्ती तयार झाल्याने अशा स्वरूपाच्या घटना घडत असल्याने तीव्र संतापाची लाट उसळली आहे, संबंधित आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्यासाठी स्वराज्य बहुजन सेनेच्या वतीने शिक्रापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांना निवेदन देण्यात आले, यावेळी स्वराज्य बहुजन सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजाराम दगडे पाटील, विठ्ठल तळोले, विशाल घोंगडे, सागर वानकर, सुधाकर मुंगळ व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते,