इंदापूर प्रतिनिधी गौतम पिसे
रविवार दिनांक २९ सप्टेंबर रोजी विविध शासकीय योजनांची माहिती मोरे वस्ती मधील महिलांना देण्यात आली.योजनेचा लाभ कसा घेता येईल, त्यासाठी लागणारी कागदपत्रे, पात्रतेसाठी निकष, नियम या संबंधीचे सविस्तर मार्गदर्शन शहर अध्यक्ष जयदेव इसवे तसेच प्रतिभा नारी परिवर्तन संस्थेचे अध्यक्ष राजू भाऊ मोहिते, बनसोडे यांनी केले,
शासनाच्या अनेक योजना आहेत ज्या गरजू महिला लाभार्थ्यांना मिळाल्या पाहिजेत योजनांच्या माध्यमातून छोटे मोठे उद्योग सुरू होऊन संसाराला हातभार लागला पाहिजे, आर्थिक प्रगती बरोबर मुलांची शैक्षणिक प्रगती कशी होईल या उदात्त हेतूने
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे पुणे शहर अध्यक्ष जयदेव इसवे यांच्या प्रयत्नातून शासकीय योजना घराघरात पोहोचविण्यासाठी माहिती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,
असंघटित घरेलू कामगार व बांधकाम कामगार यांच्या साठी असणाऱ्या कल्याण कारी योजना प्राथमिक स्वरूपात राबविण्यात येणार आहेत यासाठी दिनांक १ ऑक्टोबर पासून फॉर्म भरून घेण्यास सुरुवात केली जाणार आहे,मोरे वस्ती मधील ९०/ १०० महिला या शिबिरास उपस्थित होत्या त्यांच्या शंका व प्रश्नांचे पुर्णतः निवारण करून लाभ मिळवून देणे बाबत आश्वस्त करण्यात आले.
टीप : योजनांचा लाभ घेण्यासाठी स्वतः भेटून नाव नोंदणी करणे आवश्यक आहे,