शिरूर प्रतिनिधी वैभव पवार
शिरूर तालुका व देश पातळीवर सामाजिक कार्य व महिला सक्ष्मीकरणा साठी कटबद्ध व अग्रेसर असणाऱ्या माहेर संस्थेच्या तंत्रज्ञान प्रकल्पच्या माध्यमातून शिक्रापूर येथील बचत गटातील महिला, युवतीसाठी एक दिवशीय आकर्षक, मोहक, वेगवेगळया डिझाईन चे आकाश कंदील बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
या आकाश कंदील प्रशिक्षणासाठी एकूण 25 महिला- मुली सहभागी झाल्या होत्या. सदर प्रशिक्षण हे तंत्रज्ञान प्रकल्प प्रमुख व समन्व्यक पुणे जिल्हा स्वावलंबन प्रकल्प माहेर संस्था तेजस्विनी पवार यांनी दिले.
त्यांनी याप्रसंगी महिला व मुली या सर्व कला संपन्न व विविध प्रशिक्षण घेऊन स्वयंपूर्ण अशीच असली पाहिजे कारण सद्याच्या युगात एकाच्या उत्पन्नावर कुटुंबाचे गुजरान होणे दिवसेंदिवस अवघड होत आहे यासाठी कुटुंबातील महिलेचाही घराला हातभार लागावा या उद्देशातून हे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
महिलांनी अगदी हसतखेळत एकमेकींच्यात मिसळून मदत करीत प्रशिक्षण घेतले व स्वतः आपणही आकर्षक आकाश कंदील बनवू शकतो हा आत्मविश्वास आला आहे हे सांगितले. याप्रसंगी सर्व महिलांनी तेजस्विनी पवार मॅडम यांचे आभार मानले.