आळंदी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलनास पाठिंबा तसेच त्यांची तब्येत खूप गंभीर असल्यामुळे शासनाने त्यांचे आंदोलनाची दखल घ्यावी या मागणीसाठी आळंदी पंचक्रोशी अखंड मराठा समाजाने रस्त्यावर उतरून आळंदी बंदची हाक दिल्याने आळंदी मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, भराव रस्त्यासह चावडी चौक, नगरपरिषद व्यापारी संकुल आणि शहरातील विविध भागातील व्यापारी, नागरिकांनी आपापल्या व्यापारी आस्थापना बंद ठेवत आळंद बंद ला उत्स्फुर्द प्रतिसाद दिला.
यावेळी चाकण चौक ते प्रदक्षिणा मार्गे श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक दरम्यान समर्थनार्थ मोर्चा काढून जोरदार घोषणा देत बंद मध्ये सहभागी होण्याचे व्यापारी नागरिकांना आवाहन केले. यास मोठा प्रतिसाद मिळाला. मोर्चाची सांगता श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे श्रींचे अर्ध पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन सभेने झाली. यावेळी मराठा बांधव उत्तम गोगावले, आनंदराव मुंगसे यांनी मोर्चास संबोधित केले. यावेळी मराठा संघर्ष योद्धा मराठा सेवक मनोज जरांगे यांचे मागण्या शासनाने तात्काळ मान्य करून त्यांचे उपोषण आंदोलनाची राज्य शासनाने दखल घेण्याची मागणी करण्यात आली.
आळंदी पंचक्रोशी अखंड मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणासह संगे सोयरे अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करून मान्यता देण्याची मागणी करण्यात आली. मराठा समाजास तात्काळ आरक्षण देण्यासाठी कार्यवाही व्हावी. या मागणीचे निवेदन आळंदी पोलीस स्टेशन ला देण्यात आले आहे. त्यावर तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. या बाबतचे निवेदन माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, अर्जुन मेदनकर, अरुण कुरे. बाळासाहेब पेटकर यांनी समाजाचे वतीने आळंदी पोलीस स्टेशनमध्ये देत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आळंदी बंद ची हाक रविवारी ( दि. २२ ) देण्यात आली. यास आळंदी परिसरातून मोठा प्रतिसाद मिळाला. आळंदी बंद मध्ये मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते.
यात माजी नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, शशिकांत राजेजाधव, श्रीकांत काकडे, अरुण कुरे, संतोष सोनवणे, अर्जुन मेदनकर, आशिष गोगावले, आनंदराव मुंगसे, जयसिंग कदम, दत्ता पगडे, माऊली कुऱ्हाडे, बाळासाहेब पेठकर, रमाकांत शिंदे यांचेसह मराठा समाज बांधव उपस्थित होते. यावेळी मोर्चा दरम्यान शांततेत घोषणा देत मोर्चा काढण्यात आला. यावेळी आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, वाहतूक पोलीस शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे यांनी सुरक्षित, सुरळीत, शांततेत मोर्चा साठी पोलीस बंदोबस्त आणि वाहतुकीचे नियोजन करीत बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अखंड मराठा समाज आळंदी पंचक्रोशीचे वतीने आंदोलन शांततेत पार पडले. यावेळी पोलीस प्रशासन आणि व्यापारी आस्थापनांचे पदाधिकारी, व्यापारी, नागरिकांचे समाजाचे वतीने माजी नगरसेवक आनंदराव मुंगसे यांनी आभार मानले.