आळंदीतील देशी गोवंश बचाव मागणीसाठीचे उपोषण स्थगित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

Bharari News
0
आळंदी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर 
               तीर्थक्षेत्र आळंदी येथील इंद्रायणी नदी घाटावर गोवंश संवर्धन, गोशाळा अनुदान, गायरान जमिनी गोचारा आणि गोशाळा यांना वापरास देण्यासह प्रति गायींना प्रतिदिन शंभर रुपये अनुदान, इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करण्याचे मागणीसाठी पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक व गोभक्त मिलिंद एकबोटे यांचे उपोषण तिसर्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागण्यांचे संदर्भात लवकरच निर्णय घेऊ अशी ग्वाही दिली आणि उपोषणकर्ते मिलींद एकबोटे यांचेशी सुसंवाद साधला. तसेच यासाठी आमदार महेश लांडगे यांनी हि पाठपुरावा करून उपोषण सोडण्यास सुसंवाद साधून मध्यस्थी करीत शिष्टाई केल्याने यास यश आले. यामुळे मिलिंद एकबोटे यांनी आमदार महेश लांडगे यांचे हस्ते उपोषण सोडले. 
              या उपोषणात आमदार महेश लांडगे यांची शिष्टाई कामी आली. हरिनाम गजरात सुरु झालेले उपोषण तिसर्या दिवशी गोमातेची आरती आणि शिव वंदना घेऊन सुटले. दरम्यान महंत रामगिरी महाराज यांचे स्वागतासाठी चाकण फाटा ते आळंदी दुचाकी बाईक रॅली जय श्री राम जय घोषात झाली. रॅली इंद्रायणी नदी घाटावर उपोषण स्थळी आली. येथे रामगिरी महाराज, शाम महाराज राठोड आदींची मनॊगते, मार्गदर्शक भाषणे झाली. यावरी जोरदार घोषणा देत मार्गदर्शन झाले. 
          यावेळी आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे, गोभक्त गणेश हुलावळे, नवनाथ शिंदे, भगवान कोकरे, दिलीप महाराज ठाकरे, भाजपचे जिल्हा अध्यक्ष शरद बुट्टे पाटील, शहराध्यक्ष किरण येळवंडे, आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे, ग्रीन आर्मीचे प्रमुख प्रशांत राऊळ यांचेसह राज्यातील गोशाळा चालक, गोभक्त, भाविक नागरिक उपस्थित होते.     
               राज्य शासनाने गोवंश संवर्धन, जतन उपक्रमात लाडकी गायी,गोमाता अशी योजना सुरु करून प्रति गायी, प्रतिदिन १०० रुपये अनुदान देण्यात यावे. अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. विविध मागण्यांसाठी आळंदीत गोभक्त मिलिंद एकबोटे यांनी उपोषण सुरू केले होते होते. देशी गोवंश बचाव साठी जनआंदोलन अखिल भारत कृषी गोसेवा संघ, पश्चिम महाराष्ट्रच्या वतीने आळंदीत गोभक्त माजी नगरसेवक मिलिंद एकबोटे यांचे समवेत गोभक्त देशी गोवंशाचे संरक्षणार्थ तसेच राज्यातील गोशाळा यांना अनुदान आणि गायींसाठी गायरान जमिनी मिळाव्यात या मागण्यांस त्यांनी तीन दिवस उपोषण केले.
              राज्यातील गायरानाची जमिन गोपालन, चारा लागवड यासाठी उपलब्ध करून देणे, रस्त्यावरील मोकाट फिरणाऱ्या गोवंशाच्या संरक्षणासाठी ठोस उपाययोजना, इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करणे या मागण्यांसाठी त्यांनी उपोषण केले होते. गोवंशाच्या संरक्षणास महाराष्ट्र शास‌नाने अनुदान देऊन गायींना राजाश्रय द्यावा. इतर राज्या प्रमाणे जसे कि, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यांत देशी गोवंशाच्या पालनास अनुदान दिले जाते. त्याच प्रमाणे महाराष्ट्र राज्यांत देखील गायीचे संरक्षणार्थ अनुदान मिळाले पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे. 
           आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे यांचे मार्गदर्शनात पोलीस बंदोबस्त शांतता सुव्यवस्था यासाठी तैनात करण्यात आला होता.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!