आरएमसी मिक्सर ट्रकची स्कूल बसला जोरदार धडक सुदैवाने दुर्घटना टळली; अपघातांचे सत्र काही थांबेना

Bharari News
0
सुनील भंडारे पाटील
              वाघोली-लोहगाव (तालुका हवेली) रस्त्यावर काँक्रीट मिक्सर ट्रकने स्कूल बसला जोरदार धडक दिली. बुधवारी सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान घटना घडली आहे. स्कूल बसमध्ये शाळकरी मुले होती. सुदैवाने मुलांना कुठलीही इज्जा पोहचली नसून मोठी दुर्घटना टळली आहे. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली.  
मागील काही महिन्यांपासून अपघाताचे सत्र सुरूच आहे. मंगळवारी (२४ सप्टेंबर) पुणे-नगर रोडवर ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने एका तरुणाच्या मृत्यूची घटना घडली असताना दुसऱ्याच दिवशी बुधवारी (दि.२५ सप्टेंबर) वाघोली-लोहगाव रस्त्यावर अल्ट्रा टेक सिमेंटच्या प्लांटजवळ सिमेंट मिक्सर ट्रकने स्कूल बसला जोरदार धडक दिली. बसमध्ये विद्यार्थी असल्याने बस अपघाताची माहिती मिळताच पालकांमध्ये थरकाप उडाला. प्रशासन व लोकप्रतिनिधी याबाबत ठोस उपाययोजना करत नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
परिवहन विभागाचे अर्थपूर्ण संबंध? 
बहुतांश अवजड (डंपर) वाहने स्थानिक लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांची असल्यामुळे व परिवहन आणि वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण लागेबांधे असल्याने वाहन चालक बिनधास्त नियमाचे उल्लंघन करत वाहने चालवतात. दररोज असंख्य अवजड वाहनांमधून क्षमतेपेक्षा मुरूम, दगडांची वाहतूक केली जाते. प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी दहा दिवसाला बदलले जातात. त्यामुळे सामान्य नागरिकांना वाहन चालकांच्या विरोधात तक्रार करणे अडचणीचे ठरते. परिवहन विभागाने मोबाईल नंबर उपलब्ध करून द्यावा अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. पोलीस, महसूल, अग्निशामक, आदी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर उपलब्ध असताना केवळ परिवहन विभागाचा नंबर का उपलब्ध नाही असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

बेशिस्त व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्यात येईल. - गजानन जाधव (सहा. पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, लोणीकंद),
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!