सुनील भंडारे पाटील
कोरेगाव भीमा (तालुका शिरूर) ते वढू बुद्रुक धर्मवीर शंभूराजे समाधी स्थळ या तीन किलोमीटरच्या अंतरावर अपघात रोखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे यांच्या वतीने स्पीड ब्रेकर टाकण्यात आले होते, परंतु हे स्पीड ब्रेकर अवघ्या पंधरा दिवसाच्या आतच उखडले असून यांच्या कामाला किती क्वालिटी आहे हे यावरून लक्षात येत आहे,
गेल्या काही महिन्यांमध्ये रस्त्याचे नूतनीकरण झाल्यानंतर अतिवेगामुळे तसेच इतर कारणांमुळे पाच ते सहा जणांना वेगवेगळे अपघातात आपला जीव गमावा लागला, या मार्गावर लहान मोठे अपघाताचे प्रमाण अजून चालू असून अजून किती जणांचा जीव जाणार असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे, संबंधित खाते दुर्लक्ष करत असून अक्षरशः फडतरे वस्तीवरील नागरिकांनी वर्गणी काढून स्पीड ब्रेकर टाकले, अपघात रोखण्यासाठी नागरिक लहान स्पीड ब्रेकरची मागणी वारंवार करत असताना काही दिवसांपूर्वी पीडब्ल्यूडी च्या वतीने माहेर संस्था तसेच बाम्हण ओढ्यात स्पीड ब्रेकर टाकण्यात आले परंतु अवघ्या पंधरा दिवसातच हे स्पीड ब्रेकर उघडले यावरून कामाचा दर्जा किती चांगला आहे याविषयी नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे,
पुणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी धांइगडे यांनी सांगितलेली मी माहिती घेतो व पाहणी करून कारवाई करतो, कृष्णा पाटील यांनी सांगितलेली संबंधित ठेकेदाराकडून उखडलेले स्पीड ब्रेकर पुन्हा बनवण्यास सांगितले आहे,