तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी रासपचे गणेश लोंढे यांचा पुढाकार
पुणे जिल्हा प्रतिनिधी
शासकीय योजना तळगाळापर्यत पोहोचत नाही.यामुळे बेरोजगाराची संख्या अधिक वाढत असल्याने शासन आपल्या दारी या उपक्रमा अतंर्गत जिल्हा उद्योग केंद्र आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे गणेश लोंढे यांच्या पुढाकारातून विविध ठिकाणी
उद्योजकता प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले.या शिबीरात युवक,युवती,महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन शासकीय योजना लाभ घेण्यासाठी सर्वत्र गर्दी करत आहेत.
राज्यात शासकीय योजनाचा लाभ अजून दलित वस्ती,झोपडपट्टी,गाववाड्या पर्यत पोहचत नाही. यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या अनुसूचित जाती जमाती विभागाचे पश्चि्म महाराष्ट्राचे अध्यक्ष गणेश लोंढे यांनी पुढाकारा घेऊन राज्यभर फिरून ज्या ठिकाणी बेरोजगारांची संख्या अधिक आहे. या ठिकाणी उद्योजकता प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करत आहेत. याच धर्तीवर पुणे शहरातही या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. युवक , युवती, महिलांनी मोठ सहभाग घेऊन योजना लाभ घेत आहे. शिवाय शासकीय योजनेचा लाभ न देणार्याआ महामंडळ तसेच जिल्हा उद्योग प्रशिक्षण केंद्राशी संपर्क साधून समन्वयाचे काम करत आहेत.
तरूणामध्ये बेकारीचे प्रमाण अधिक वाढत आहे. नोकरीची कमतरता याचा विचार करून युवक-युवती,महिलांनी उद्योजकाकडे वळून स्वत:चा व्यवसाय केले पाहिजे. यासाठी लोंढे यांनी या कामासाठी राज्यात विविध समन्वयकांचे गट तयार केले आहे.
पुणे शहरातील शिबीरात उद्योग केंद्राचे विभागीय अधिकारी अभिराम डुबीर यांच्या मार्गदर्शनाखाली सुनिल पाटील यांनी सुशिक्षीत बेरोजगारी,महिला सबलीकरण या विषयासह शासकीय योजनाचा कसा लाभ घ्यावा याची माहिती शिबीरात सहभाग झालेल्या युवती, युवक,महिलांना ,तसेच गरजू पुरूषांना देत आहेत.
या उपक्रमा वेळी रासपचे अॅनड.संजय माने, लहुजी समता परिषदेचे अनिल हातागळे, अभिनेते सुजित रणदिवे, अॅलड,पौर्णिमा कोलते, अनिल जगताप, संजय केंदळे, लक्ष्मी कांबळे, बालाजी पवार, रासपचे शहराध्यक्षा कलावती तुपसौंदर, अकुंश देवडकर, डॉ.नारायण डोलारे, मुन्नाि मैड, सुरज लाटे, अमित कदम, राजेश लवटे, लक्ष्मण ठोंबरे,आदी उपस्थित होते.