दणका भरारीचा...! बिबट्याचा मुक्त संचार बंद करा शेतकरी संघटनेच्या उपोषणला यश

Bharari News
0
जुन्नर प्रतिनिधि 
                वन्यजीव संरक्षण कायद्याचा आधार असल्याने बिबट्याचा मुक्त संचार व जुन्नर बिबट्या संरक्षण अभयारण्य मुळे जुन्नर तालुक्यातील बऱ्याच लोकांना प्राण गमवावे लागले. शेतकऱ्यांना दिवसा रात्री शेतीचे कामे करता येत नाहीत बिबट्याचा मुक्त संचार बंद करण्यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीने आमरण उपोषण दि.14 ऑक्टोबर 2024 पासून शेतकरी संघटनेचे सचिन थोरवे यांनी अमरण उपोषण सुरू केले होते, जुन्नर तालुक्यात होणाऱ्या माणसावरील बिबट्यांच्या हल्ल्याविषयी भरारी न्यूजने वृत्तांकन केले आहे, त्यामुळे प्रशासनाला जाग येऊन आंदोलकांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या,
                  तसेच संजय भुजबळ प्रमोद खांडगे पा. योगेश तोडकर यांनी साखळी उपोषण सुरू केले होते उपोषणामध्ये प्रामुख्याने पुढील प्रमाणे मागण्या होत्या १) जुन्नर तालुका बिबट मुक्त करा २)वन्यजीव प्राणी संरक्षण कायद्यात बदल करण्यात यावा ३)ज्या ठिकाणी बिबट्याचा जास्त वावर आहे त्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे बसवण्यात यावी ४) जुन्नर तालुक्यातील सर्व बिबटेजर बंद करून बिबट निवारा केंद्रात सोडण्यात यावे
५)जुन्नर तालुका बिबट हॉटस्पॉट झाला असल्याने शाळकरी मुलांना पाई पाई अथवा सायकलने शाळेत जाणे मुश्किल झाले आहे वन विभागाने त्यांना स्कूल बस करून देण्यात यावे
६)बिबट हल्ल्यात मृत पावलेल्या नागरिकांना 25 लाख रुपये दोन टप्प्यात देण्यात येते ती रक्कम एक कोटी रुपये करण्यात यावी व एक रकमी देण्यात यावी
७)बिबट समस्या अत्यंत गंभीर झाली असल्यामुळे जुन्नर तालुक्यामध्ये बिबट नसबंदी करण्यात यावी 
या मागण्या होत्या मदतीचा विषय राज्य शासनापर्यंत पोहोचवण्याचा आश्वासन वन विभागाचे अधिकारी सातपुते साहेब घोडेगाव वनविभागाचे अधिकारी लिमकर जुन्नर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी किरणजी अवचार साहेब यांनी दिले उपोषण सोडवण्यासाठी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशिलदादा शेरकर उपस्थित होते उपोषणाला रमेशजी शिंदे अजितनाना वालझाडे अजितदादा वाघ पिराजी टाकळकर गणेश नवले गणेश गडगे आदी मान्यवरांनी पाठिंबा दिला काल विधान भवन पुणे येथे कलेक्टर साहेबांबरोबर जुन्नर तालुक्यातील लोकप्रतिनिधी ची मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये शेतकरी संघटनेच्या मागण्या मांडण्यासाठी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ प्रतिनिधी अंबादास हांडे गेले होते शेतकरी संघटनेच्या मागण्या कलेक्टर साहेबांना सांगण्यात आल्या व मागण्या मान्य करत संघटनेचे उपोषण सोडवण्यासाठी कलेक्टर साहेबांनी संघटनेला विनंती केल्यामुळे उपोषणकर्ते सचिन थोरवे यांनी उपोषण सोडल्याचे अखिल भारतीय शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रमोद खांडगे यांनी सांगितले,
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!