सुनील भंडारे पाटील
पुणे जिल्ह्यात बहुचर्चित असणारी शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाची निवडणूक तोंडावर येऊन ठेपलेली असताना, इच्छुक उमेदवारांची रेलचेल दिसत आहे, दोन्ही तालुक्याच्या राजकारनात दंड थोपटून तयार असणारे आमदार पवार यांच्या विरोधात लढणारा एकही उमेदवार अजून विरोधकांनी जाहीर केल्याचा नसल्याने चर्चेला उधाण आले आहे,
राजकारणात कायम सक्रिय असणारे अष्टपैलू नेतृत्व आमदार अशोक बापू पवार यांनी गेल्या दोन पंचवार्षिक गाजवलेले असून विरोधकांना त्यांनी कायम चारी मुंड्या चीट केले आहे त्यामुळे पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवणे म्हणजे विरोधकांना खूप मोठे चॅलेंज आहे, पवार यांनी शिरूर तसेच हवेली तालुक्यामध्ये विकास कामांचा धडाका लावला आहे, विकास कामे तसेच विकास कामांचे फलक सर्वच गावांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत, पहिले काम नंतर निवडणूक असा नियम असणारे आमदार पवार यांनी जनतेच्या संपर्कात राहून आपली पात्रता नेहमी उंचावली आहे,
शिरूर हवेलीच्या राजकीय आखाड्यात दंड थोपटून तयार असणारे आमदार पवार यांनी जोरदार तयारी केली असताना विरोधी पक्षाकडून अजूनही उमेदवार जाहीर केले नसल्याने शिरूर हवेलीच्या जनतेमध्ये गावागावांमधील कट्ट्यावर चौकात चौकात चर्चेला जोरदार उधाण आल्याचे चित्र स्पष्ट होत आहे,