खेड प्रतिनिधी
येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये काही गटातटातील वाद व त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी परिस्थिती गावचे पोलीस पाटील, सरपंच व सुजान नागरिक यांनी याबाबत पोलिसांना निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे. असे मत खेड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांनी पारगाव कारखाना पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस पाटील, सरपंच, महिला दक्षता समिती व गाव प्रमुखांच्या आयोजित बैठकीत मत व्यक्त केले.
यावेळी पुढे बोलताना उपविभागीय पोलीस अधिक्षक मांडवे म्हणाले की, गावात असणारे गंभीर गुन्हे व गैरसमजातून वाढणारे वाद यावर पोलीस पाटलांनी विशेष लक्ष ठेवावे. तसेच पोक्सो गुन्ह्या संदर्भात वेळीच पायबंद घालण्यासाठी पोलीस प्रयत्नशील असून पोक्सो संदर्भात जर पालक तक्रार द्यायला तयार नसेल तर सुजाण नागरिकांनी तक्रार देण्यासाठी पुढे यावे. असे आवाहन केले. याबाबत शाळा कॉलेजात लैंगिक शोषण, व्यसन व गुन्हेगारी या विषयक माहिती देण्यासाठी पोलीस सहकार्य करत आहे. तसेच गावागावात ग्रामपंचायत वित्त संस्थांना मार्फत गावात येण्या जाण्याच्या रस्त्यांना कॅमेरे बसवण्याबाबत पत्र देण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी पारगाव कारखाना पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांनी पारगाव पोलीस स्टेशन हद्दीतील विविध गुन्ह्यांचा आढावा घेतला. कार्यकमास विविध गावचे सरपंच, पोलीस पाटील, महिला दक्षता समिती, तंटामुक्ती समिती पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक शिंगवे गावचे पोलीस पाटील गणेश पंडित यांनी केले तर आभार जवळे गावचे पोलीस पाटील रवींद्र लोखंडे यांनी मानले.