सुनील भंडारे पाटील
शाश्वत गोष्ट टिकते तर अशाश्वत गोष्ट टिकत नाही . औदयोगीकरणाने अनेक सुविधा निर्माण झाल्या , परंतु आजही माणूस असुरक्षित वाटतो कारण आपल्याला आपल्या मराठी संस्कृतीचा विसर पडत चाललेला आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध बांधकाम ट्यावसायिक व पंचायत समिती शिरूर चे माजी सभापती भाऊसाहेब साकोरे यांनी गोंदण दीपावली विशेष अंकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने ट्यक्त केले .
कलस्वामिनी प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने दरवर्षी दसऱ्याच्या अगोदर या अंकाचे प्रकाशन होत असते . यावर्षी प्रतिष्ठानचा अकरावा अंक प्रकाशित करण्यात आला .कोरोनाच्या काळातही अंक प्रकाशित करण्यात आला होता . पिंपरी चिंचवड येथील सायन्स पार्क हॉलमध्ये गोंदण दीपावली अंकाचे प्रकाशन मोठ्या दिमाखात करण्यात आले .यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भाऊसाहेब साकोरे तर प्रमुख पाहुणे म्हणून इतिहास अभ्यासक भारत पांडुरंग महारुगडे उपस्थित होते. पुस्तकांच्या बरोबरीने दिवाळी अंकांचीही समृद परंपरा आहे. आपल्या साहित्य संस्कृतीचे ते एक दैशिष्ट्य आहे.. काळाच्या ओघात साप्ताहिकं, मासिकं बंद पडली असली तरी आजही वार्षिक अंकाच्या स्वरूपात दिवाळी अंकांची परंपरा संपादकांनी आणि प्रकाशकांनी जाणीवपर्वक जपली आहे . असे गौरव उद्गार काढले .
तसेच प्रत्येक गावाला इतिहास असतो परंपरा व संस्कृती असते. असेही त्यांनी सांगितले या अंकांत जेष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस , ह भ.प प्रशांत महाराज मोरे , ललिता सबनीस , अविनाश हळबे , डॉ दिलीप गरुड . दादासाहेब गावडे यांचे व इतर अनेक नामवंत साहित्यिकांचे वाचनीय लेख , कथा व कविता समाविष्ट आहेत यावेळी व्यासपीठावर कुलस्वामिनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ . नंदकुमार माळशिरसकर, गोंदण दीपावली अंकाचे संपादक व कुलस्वामिनी परतिष्ठानचे संस्थापक विश्वस्त . पांडुरंग गाडीलकर , कुलसू्वामिनी चे कार्याध्यक्ष बापूसाहेब जाधव ,ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ . हनुमंतराव भवारी व ज्येष्ठ साहित्यिक दादाभाऊ गावडे उपस्थित होते .
प्रकाशनाच्या कार्यक्रमानंतर नाट्य संमेलन आयोजित करण्यात आले होते या काव्यसंमेलनाचे अध्यक्षपद प्रा डॉ हनुमंतराव भवारी यांनी भुषविले . या कवी संमेलनात अनेक कवी व कवयित्रीनी आपल्या कविता सादर केल्या . या कार्यक्रमाचे स्त्रसंचालन विश्वस्त चांगदेव पिंगळे यांनी तर प्रास्ताविक संस्थापक विश्वस्त प्राचार्य गाडीकर सर यांनी केले .तर प्रतिष्ठानची वाटचालीबद्दल अध्यक्ष डॉक्टर माळशिरसकर यांनी माहिती दिली . या कार्यक्रमाचे आभार कार्याध्यक्ष . बापूसाहेब जाधव यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी क्लस्वामिनीच्या विश्वस्त उज्वला पिंगळे ,उपाध्यक्ष शांता साकोरे खजिनदार लक्मणराव नलावडे,डॉक्टर सुभाष पिंगळे , नितीन पानसरे , विइ्लराव जाधव , संभाजीराव चौधरी , बिभिषण चौधरी.नारायण गावडे, प्रदीप वाव्हळ व इतर सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी परिश्रम घेतले,