आगामी विधानसभा निवडणुकीचे अनुशंगाने गुन्हे प्रतिबंधक तसेच पाहिजे व फरारी कारवाया आरोपींचा शोध घेणे बाबत वरीष्ठांचे आदेशाप्रमाणे आज दिनांक २२/१०/२०२४ रोजी गुन्हे शाखा युनिट ६ कडील अधिकारी व अंमलदार हे युनिट हदीत गुन्हे प्रतिबंधक गस्त करत असताना,
पोलीस उप-निरीक्षक 'दळवी, पो अं. ताकवणे, पो.अं. व्यवहारे., पो.अं. पवार यांनी मिळालेल्या गोपनीय बातमीवरून लोणीकंद पो.स्टे. गुर.नं २०/२०२२. कलम ३०२. ३०७, ३४१, १४३ १४७, १४८. १४९. ४२७ भा.द.वि सह आर्म ऑक्ट कलम ३२५). ४२५) सह क्रिमीनल लॉ अमेंडमेंट ऑक्ट ३७ सह महा.पोलीस कायदा कलम १३५ ३७ (१) (३) सह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रन अधिनियम कलम ३ (9) () (३) (२) या गुन्हयातील अडीच वर्षापासुन फरार असलेला आरोपी नामे ऋग्वेद जालिंदर वाळके वय २३ राहणार पेरणे तालुका हवेली जिल्हा पुणे यास पेरणे टोलनाका शेजारी सागर हॉटेल जवळ, पेरणे, ता.हवेली, जि पुणे येथुन सापळा रचुन ताब्यात घेतले आहे.
सदर आरोपीविरूद्ध यापुर्वी खून गंभीर दुखापत, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे इत्यादी गुन्हे दाखल आहेत. सदरची कामगिरी पोलीस उपआयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहा. .पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट -६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहा पोलीस निरीक्षक कांबळे, उप-निरीक्षक दळवी, पो.हवा.६७८9 / सकटे, ६८३५/मेमाणे, पो.ना.७३१७/ मुंढे ७८०५/ कारखेले, पो.अं.८9५९/ताकवणे, २६८८/व्यवहारे, ८२०३/पवार, पो.अं.०४५२/ काटे, १0४१९/धाडगे ्७६/तनपुरे, मपोअं.९४७९/पानसरे, मपोअं.9००४ मांदळे यांनी केली आहे,