पुणे प्रतिनिधी चंद्रकांत वारघडे
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा..
या उक्तीनुसार माहिती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांच्या मार्गदर्शनातून व हवेली तालुका अध्यक्ष कमलेश बहिरट यांच्या संकल्पनेतून दरवर्षी प्रमाणे यंदाही वाघोली आणि परिसरातील स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी भेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी स्वच्छता कर्मचाऱ्यांना मिठाईचे वाटप करून दिवाळी गोड करण्यात आली,
परिसरामध्ये वर्षभर घरोघरी जाऊन ओला व सुका कचरा गोळा करून खऱ्या अर्थाने दुसऱ्यांच्या घरामध्ये दिवाळी साजरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुद्धा दिवाळी साजरी व्हावी या उद्देशाने माहिती सेवा समिती गेल्या अनेक वर्षापासून स्वच्छता कर्मचाऱ्यांना मिठाई वाटप करून त्यांचा चांगल्या पद्धतीने सन्मान करत असते,
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून वाघोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक पंडित रेजीतवाड यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना परिसराची स्वच्छता करण्याबरोबरच स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन केले तसेच चंद्रकांत वारघडे यांनी यापुढील काळात कोणती अडचण आल्यास पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले तसेच सर्वांनी हि दिवाळी पर्यावरण पुरक साजरी करण्याचे आव्हान वारघडे यांनी केले.सूत्रसंचालन प्रास्ताविकामध्ये कार्यक्रमाचे आयोजक कमलेश बहिरट यांनी त्यांच्या आजोबा विठ्ठल बहिरट यांनी दिलेल्या शिकवणीनुसार मोठ्यांची दिवाळी कायम होत असते गोरगरिबांची दिवाळी साजरी झाली पाहिजे या शिकवणीतून ही परंपरा सुरू ठेवली असल्याचे प्रतिपादन केले.
स्वच्छता पुणे सोसायटीच्या पौर्णिमा ओवाळ यांनी कमलेश बहिरट आणि मार्गदर्शक चंद्रकांत वारघडे तसेच माहिती सेवा समितीच्या निमित्ताने आभार मानले याप्रसंगी वाघोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली पंडित रेजीतवाड साहेब माहिती सेवा समिती महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत गोविंद वारघडे हवेली तालुका अध्यक्ष कमलेश बहिरट स्नेहल स्टोन क्रेशर चे श्रीकांत गांधी पत्रकार ज्ञानेश्वर पाटेकर पत्रकार परशुराम चव्हाण पत्रकार महादेव साकोरे संभाजी चौधरी उद्योजक गणेश कटके बालाजी उद्योगसमूह चे किरण जाधवराव उद्योजक संतोष बहिरट प्रमोटर्स अँड बिल्डर्स विशाल बहिरट कैलास बहिरट विलास बहिरट उद्योजक रितेश बहिरट अविष्कार बहिरट मा. अग्निशामक दल अधिकारी शिवाजीराव चव्हाण हिंदवी चे पदाधिकारी विलास नवले ऋषिकेश परदेशी नितीन माळी मृत्युंजय ग्रुपचे योगेश बर्डे सागर जगताप अशोक तांदळे सुनील सकट उद्योजक विक्रम गडदे गणेश तोरसे स्वच्छ पुणे सहकारी संस्थेचे शिवाजीराव मोघे राहुल पाटोळे पौर्णिमा ओव्हाळ महिला बचत गट अध्यक्षा वनिता बहिरट अश्विनी जगताप वर्षा वाघमारे आशा बहिरट ताराबाई बहिरट मंगल बहिरट लिलाबाई बहिरट मीना बहिरट पूजा बहिरट कोमल ढेरंगे वैष्णवी बहिरट विटकर पूजा वीर ,मोकमपल्ले मोठ्या संख्येने उपस्थित होते.