यवत प्रतिनिधी
लोप पावत चाललेल्या संस्कृती ग्रामीण भागातील तरुण पिढी अत्यंत उत्साहाने जोपासताना दिसून येत आहे.नवीन पिढी साठी बैलपोळा हा आकर्षणाचा विषय बनला आहे,आणि नवीन पिढी प्रत्येक सणांमध्ये आपला सहभाग प्रार्थनीय ठेवत असलेले दिसून येत आहे. कासूर्डी (ता दौंड) जिल्हा पुणे या ठिकाणी दि ०२ ऑक्टोबर रोजी बैल पोळा सणाच्या निमित्ताने कासुर्डी पंचक्रोशीतील सर्व सामान्य शेतकरी बांधवांनी खिल्लारी बैलांना रंगीबेरंगी सजावट करुन ग्रामदेवतेच्या दर्शनासाठी आणले , खिल्लारी बैलांची मिरवणूक काढण्यात आली होती ही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची पारंपारीक परंपरा शेतकऱ्यांनी कायम राखली आहे.
या वेळी पारंपारिक ढोल ताशा संबळ हलगी वाद्यांच्या गजरात बैलाची मिरवणूक गावातून काढण्यात आली. ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिर ,विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कासुर्डी पंचक्रोशीतील शेतकरी आणि युवा तरुणांनी खिल्लारी बैल जोडी घेऊन येऊन मोठ्या उत्साहाने पारंपरिक ढोल,ताशा,संबळ, हलगी ,वाद्यांच्या गजरात खिल्लारी बैल जोडी देव दर्शनासाठी आणली आणि गावातून मिरवणूक काढण्यात आली. हा बैल पोळा उत्सव पाहण्यासाठी गावातील लहान ,मोठे ,जेष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती. या मध्ये प्रामुख्याने कासुर्डी,भोंडवे वस्ती, खामगाव फाटा, कासुर्डी फाटा, या गावातील शेतकरी आणि तरूण पिढी प्रामुख्याने उपस्थिती राहून बैलांची मिरवणूक काढली.आज ही कासुर्डी गावामध्ये, भोंडवे वस्ती वस्ती, खामगाव फाटा, कासुर्डी फाटा येथे अनेकांच्या घरी खिल्लारी बैल जोडीचे संगोपन मोठ्या प्रमाणात केलेल दिसून येते. हैसेला मोल नाही ही परंपरा पारंपारिक वाद्य ,फटाक्यांच्या धुम धडाक्यात विविध गावातील वाड्या वस्त्यांवरील खिल्लारी बैल जोडी एकत्रित घेऊन मोठ्या उत्साहात मिरवणूका काढण्यात आल्या.
या प्रसंगी कासुर्डी पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती.या प्रसंगी कासुर्डी पंचक्रोशीतील नागरिकांनी बैल पोळा सणाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. आणि अत्यंत उत्साहा मध्ये बैलपोळा साजरा करण्यात आला.