पुणे जिल्हाधिकारी यांचे लिखीत आश्वासनाने जमीन हक्क सत्याग्रहाला स्थगिती

Bharari News
0
हवेली प्रतिनिधी
                 दगडखाण कामगार विकास परिषद व फुटपाथ वाशी परिषद महाराष्ट्रच्या वतीने जमीन हक्क सत्याग्रहाचे दि 2 आक्टोंबर 202४ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत जमीन हक्क सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आले होते. 
                आज जिल्हाधिकारी यांची अँड. बी एम रेगे, अँड पल्लवी रेगे व कामगार प्रतिनीधीनी भेट घेतली. निवेदनातील सर्व मागण्यावर सविस्तर चर्चा झाली व संबंधित विभागाचे अधिकारी यांचे उपस्थितीत दि ७ आक्टोंबर ठिक 12.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक लावण्याचे लिखीत आश्वासन दिल्याने नियोजीत जमीन हक्क सत्याग्रहाला बैठकी पर्यत स्थगिती देण्यात आली आहे. 
                 प्रमुख मागण्या:(1). मौजे वाघोली गायरान गट नंबर १२९, ११23, १४१९ व १५६८ या भुखंडावर राहणारे दगडखाण कामगार कुंटुंबांच्या नावे सातबारावर नोंदी. (2). मौजे वाघोली गायराण गट नं १४१९ मध्ये असलेल्या अधिकृतकचरा डेपो खालील दोन एक्कर भूखंड दगडखाण कामगार विकास भवनासाठी मंजूर करावा. (3) जिल्हयातील भिल्ल आदिवासी समाजाने गायराण व वनजमीनीवर घरासाठी व उपजिवीकेसाठी अतिक्रमण केलेल्या भुखंडाचे सातबारा त्यांचे नावे करावेत. (४) डेक्कन झेड ब्रीज खाली राहणारे पारधी समाजाचा घर प्रपंचा व व्यवसायाची साधणे मुळा नदीच्या पुरात वाहून गेली व पुणे मनपाने त्यांची घरे बुल्डोजरने पाडून टाकली यांचे पुनर्वसन करावे आदि मागण्या जिल्हाधिकारी समोर मांडण्यात आल्या.
            चर्चे दरम्यान दि.१० मे 2023 रोजी वाघोली ते जिल्हाधिकारी कार्यालय पुणे असा भव्य पदयात्रा मोर्चा काढण्यात आला होता. त्या मोर्चाला जिल्हाधिकारी यांनी दिलेले लेखी आश्वासनाची अद्याप अंमलबजावणी झाली नाही शिवाय वेळो वेळी प्रशासनाचा पाठपुरावा करण्यात आला मात्र प्रशासनाकडून जाणिवपूर्वक या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जाते परिणामी वाघोली येथील दागखाण कामगार कुटुंबे, भिल्ल अदिवासी व पारधी समाजातील कुंटुंबांना मुलभूत हक्क व सोई सुविधा पासून वंचित राहावे लागत असल्याची जिल्हाधिकारी यांना जाणिव करून देण्यात आली. 
               शिष्टमंडळामध्ये अँड बी.एम.रेगे, अँड पल्लवी रेगे, कांताबाई पवार म-याप्पा चौगुले, प्यारेलाल जाठव, अदिनाथ चांदणे आदि उपस्थीत होते. जिल्हाधिकारी यांचे बैठक घेण्याबाबत दिलेले लिखीत आश्वासनामुळे जमीन हक्क सत्याग्रहाला बैठक तारखे पर्यत स्थगिती दिल्याची माहिती परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड बी.एम. रेगे यानी दिली.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!