क्राइम रिपोर्टर विनायक साबळे
वेगवेगळ्या राज्यात ९० पेक्षा अधिक जबरी चोरीचे गुन्हे दाखल असलेला अट्टल गुन्हेगार वाघोली (तालुका हवेली) येथून केले जेरबंद ; गुन्हे शाखा युनिट ६ पथकाची कामगिरी
आज रोजी युनिट ६ हद्दीमध्ये चैन स्नेचींग प्रतिबंध करत असताना चैतन्य पुरी पोलीस स्टेशन (रजकोंडा हैद्राबाद) गुन्हा रजि नंबर 789/2024 BNS ACT 309(4) मधील अज्ञात चोरटा गुन्हा घडले पासून फरार फरार होता. सदर गुन्ह्याचे तपास कामी हैदराबाद पोलीस यांचे टीमसह आम्ही तांत्रिक विश्लेषण व बातमीदार यांच्यामार्फत सदर अज्ञात चोरट्याची माहिती घेतली असता तो वाघोली चोखीधानी रोड वरील बजाज शोरूम जवळ असल्याची माहिती मिळाल्याने सदर चोरट्यास मोठ्या शिताफीने सापळा रचून ताब्यात घेऊन त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव अच्युत सोमांना कुमार वय 34 राहणार कोळीवाड जिल्हा धारावाड हुबळी कर्नाटक असे सांगितले. सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचेवर वेगवेगळ्या राज्यात जबरी चोरीचे एकूण ९० गुन्हे दाखल आहेत. त्यास पुढील कारवाई कामी वारिष्ठांचे आदेशाने चैतन्य पुरी पोलीस स्टेशन (रजकोंडा हैद्राबाद) पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार ( पोलीस आयुक्त पुणे शहर ), मा शैलेश बलकवडे (अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे ), मा निखिल पिंगळे (पोलीस उपायुक्त , गुन्हे शाखा ), मा राजेंद्र मुळीक सहा पोलीस आयुक्त -२) यांचे मार्गदर्शनाखाली मा सुदर्शन गायकवाड पोलीस निरीक्षक युनिट ६ पुणे शहर, पोलीस निरीक्षक अजय वाघमारे क्राइम ब्रांच पुणे शहर,रमेश मेमाणे, नितीन मुंढे, सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, समीर पिलाने, ऋषिकेश व्यवहारे, नितीन धाडगे, बाळासाहेब तनपुरे , गणेश डोंगरे, कीर्ती मांदळे, सुहास तांबेकर यांचे पथकाने केली.