सुनील भंडारे पाटील
केसनंद (तालुका हवेली) कोलवडी रस्त्यावर अपघात झाल्याने एका निष्पाप जिवाचा बळी गेल्याने कुटुंब उघड्यावर आले, या अपघाता संदर्भात लोणीकंद पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून बळी गेलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी होत आहे,
या संदर्भात लोणीकंद पोलीस स्टेशन ने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार किरण अशोक कांबळे राहणार वाडेबोलाई तालुका हवेली जिल्हा पुणे, यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा मेहुना अजय प्रताप सूर्यवंशी वय 32 वर्ष राहणार रा सोनी मळा साष्टी कोलवडी हे आपल्या स्प्लेंडर गाडी नंबर mh १२ my ०१६५ या गाडीवरून केसनंद कोलवडी मार्गावर प्रवास करत असताना टाटा टेम्पो नंबर mh १२hd ०५१८ (ड्रायव्हर गणेश तुकाराम शिंदे राहणार चव्हाण कॉम्प्लेक्स शिक्रापूर मूळ राहणार टाकळी लोणार तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर ) या भरधाव वेगाने, निष्काळजीपणे वाहन चालवून स्प्लेंडर गाडीला ठोस मारून, अपघात केला आहे, तसेच सूर्यवंशी यांच्या डोक्यात किरकोळ व गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाल्याची फिर्याद लोणीकंद पोलीस स्टेशन येथे दाखल झाली आहे, पुढील तपास लोणीकंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश खटके करत आहेत, या अपघातामुळे सूर्यवंशी यांचे संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले असून न्याय मिळावा अशी मागणी करत आहे,