कोरेगाव भीमा (तालुका शिरूर) येथील नागेश (बापू) सुखदेव गव्हाणे (वय 37 वर्ष) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले, त्यांचे पश्चात पत्नी, एक मुलगा ,एक मुलगी, भाऊ,भावजय, पुतणे, व इतर असा परिवार आहे, नागेश बापू यांनी जिल्हा परिषद शाळा कोरेगाव भीमा शिक्षण समितीवर अध्यक्ष म्हणून काम पाहिले असून, कोरेगाव भीमा गावांमधील सामाजिक कामामध्ये त्यांचा सहभाग होता, अत्यंत मनमिळाऊ दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून त्यांची ओळख होती, कायम सर्वांच्या अडचणीमध्ये सहभाग घेणारा हा माणूस अचानक हरपल्याने त्यांच्या कुटुंबावर गव्हाणे परिवारावर तसेच कोरेगाव भीमा गाव, पंचकोशी मध्ये दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे, दशक्रिया बुधवार दिनांक 30/10/2024 रोजी सकाळी 8 वाजता कोरेगाव भीमा तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे भीमा नदीतीरी होईल,
निधनवार्ता-नागेश(बापू) गव्हाणे(पाटील)
October 29, 2024
0
निधनवार्ता-नागेश(बापू) सुखदेव गव्हाणे(पाटील)
Tags