आळंदी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर
तीर्थक्षेत्र आळंदी ग्रामस्थ इंद्रायणी आरती ग्रुप, राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान, आळंदी जनहित फाउंडेशन, महिला बचत गट सदस्य, पदाधिकारी, महिला मंडळ तसेच आळंदी ग्रामस्थ यांचे वतीने इंद्रायणी नदी घाटावर घाट स्वच्छता करीत इंद्रायणीची आरती हरिनाम गजरात झाली. रमा एकादशी आणि वसुबारस दिनी इंद्रायणीची आरती करून नदी घाट स्वच्छता करीत सामाजिक बांधिलकी जोपासली. यावेळी महिला भाविक, वारकरी यांची गर्दी झाली होती.
यावेळी राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अनिता झुजम, पुणे कोषागार कार्यालय अप्पर कोषागार अधिकारी मनीषा संदीप जाधव, होप समुपदेशन सेंटर पुणे साई वाणी संस्थापक मृणाली जाधव,सरस्वती भागवत, नंदा भांबरे, जिजाबाई भांबरे, लताबाई शेवते, उषा नेटके, कल्याणी मालक, भागीत्रा भागवत, राणी वाघ, लता वरतूळे, सिद्धी भांबरे, प्रणाली पाचुंदे, शोभा कुलकर्णी, पुष्पां लेंडघर, सुरेख कुऱ्हाडे, नीलम भेंडे, श्वेता महाजन, सावित्री घुंडरे पाटील, पार्वती गव्हाणे, शालन होनावले, उषाबाई गोरख पाटील, मंगल पाटील, सखुबाई गायकवाड, शैला तापकीर, वत्सला दाभाडे, निलम धेंडे, रेखा खंडागळे, सुनीता माने, रेखा मनोरे, शोभा पाटील, सविता कांबळे, अरुणा जगताप, नंदा महाडिक, सत्यभामा जाधव, माऊलींचे मानकरी गणपतराव कुऱ्हाडे, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष संयोजक अर्जुन मेदनकर आदींसह मोठ्या संख्येने महिला, ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी अनिता झुजम यांचा आळंदी जनहित फाउंडेशनसह महिला मंडळाचे वतीने सत्कार करण्यात आला.
इंद्रायणी नदीचे पावित्र्य जोपासण्याचे आवाहन करीत इंद्रायणी नदी घाटावर आरती उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात सर्वानी सहभागी व्हावे असे आवाहन राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अनिता झुजम यांनी केले. इंद्रायणी नदीचे प्रदूषण दूर करण्यासाठी उपाय योजना कराव्यात असे आवाहन करण्यात आले. आळंदी ग्रामस्थ, इंद्रायणी आरती ग्रुपचे वतीने अनिता झुजम, अर्जुन मेदनकर यांनी संयोजन केले. विविध मान्यवरांनी यावेळी मनोगते व्यक्त केली. पसायदानाने उपक्रमाची सांगता झाली.