प्रा. कुंडलिक कदम
वाचन प्रेरणा दिन साजरा
छत्रपती संभाजी महाराज यांच्या साहित्य विषयी साहित्य संमेलन घेणार
रांजणगाव गणपती प्रतिनिधी संभाजी गोरडे
छत्रपती संभाजी महाराज यांच्या साहित्य संपदेमधून राजनीती, युद्धनीती, समाज नीती, कृषीनिती व महिलांविषयी आदर्शव्रत मुल्य दिसून येतात. अशा बुधभूषण, नखशिखा, सातसतक, नायिकाभेद असे ग्रंथ युवकानी वाचले पाहिजे. त्यांचे साहित्य समाजासमोर आले पाहिजे. हे साहित्य प्रेरणादायी असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रा. कुंडलिक कदम यांनी श्री तिर्थ स्थळ वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळी वाचन प्रेरणा दिनानिमित्त विचार व्यक्त केले.
यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद शिरुर ग्रामीण वतीने संभाजी महाराज यांच्या साहित्यावर साहित्य संमेलन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी छत्रपती संभाजी महाराज, कवी कलश, वीर बापूजी शिवले, वीरंगणा पद्मावती शिवले यांच्या समाधी स्थळावर पुष्पाजंली अपर्ण करुन शिव प्रेरणा स्तोत्र म्हणण्यात आले. यावेळी विठ्ठल वळसे पाटील लिखीत क्रांतीभूमी, संभाजी शिवले लिखीत मृत्यूंजय अमावस्या, शेखर फराटे लिखीत किंगमेकर ग्रंथ संपदा भेट देण्यात आली. यावेळी वाचन प्रेरणा दिनानिमित्त दिवगंत राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.
यावेळी कार्यक्रमास शिरूर तालुका महाराष्ट्र साहित्य परिषद शिरुर ग्रामीण अध्यक्ष मनोहर परदेशी, बालकुमार साहित्य परिषद सेवा पुणे शिरुर अध्यक्ष राहुल चातूर, शंभूभक्त सोमनाथ शिवले, केशव टेंगले, सागर बनसोडे, निखील टेंगले, सोमनाथ भाडळे, विशाल भाडळे, लेखक कवी सचिन बेंडभर, लेखक शेखर फराटे, लेखक संजीव मांढरे, कवी आकाश भोरडे, आयुष वाळके, गणेश ढवळे आदी लेखक, कवी, पत्रकार उपस्थित होते.
शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थान वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रास्ताविक व स्वागत स्तंभलेखक विठ्ठल वळसे पाटील तर आभार कवी संभाजी गोरडे यांनी मानले.