दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर टाकळी भीमा, विठ्ठलवाडी, शिक्रापूर या ठिकाणी एक दिवा सैनिकांसाठी चा उपक्रम उत्साहात साजरा

या सैनिकांच्या सन्मानासाठी आपले लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक वर्षी सीमेवर जाऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करतात. ही बाब प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. या प्रेरणेतूनच समस्त हिंदू आघाडी चे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्या मार्गदर्शनाखाली,शिवराज्य प्रतिष्ठाण चे अध्यक्ष तथा निमगाव म्हाळुंगी चे विद्यमान सरपंच बापूसाहेब काळे, साईक्रांती प्रतिष्ठाण चे अध्यक्ष तथा वडनेर चे सरपंच नवनाथ निचित यांच्या नेतृत्वा खाली गेली ९ वर्ष सैनिक सन्मान दिवाळी संपूर्ण पुणे जिल्ह्यात साजरी केली जाते, 
यावर्षी सुद्धा शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा, विठ्ठलवाडी, शिक्रापूर, पारोडी घोलपवाडी अशा अनेक गावांमध्ये सैनिकांच्या घरी आपले सर्व कार्यकर्ते पहाटेच जाऊन सैनिकांच्या घरांना फुलांच्या तोरणाने त्यांचे घर सजवले.तसेच रांगोळी काढून आजूबाजूचा परिसर सुशोभित केला आणि त्याठिकाणी दिवाळीच्या आनंदाचे प्रतीक असलेला दिवा पेटवून सैनिकांच्या कुटुंबियांसमवेत दिवाळी साजरी केली.तसेच मिठाई देऊन भारत मातेचा जयघोष, छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयघोष तसेच जय जवान, जय किसान अशा घोषणा देऊन सैनिकांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान केला,
आपल्या घरातील सैनिकांच्या आठवणीने व्याकुळ झालेल्या सैनिक कुटुंबियांसोबत काही वेळ कार्यकर्त्यांनी व्यतीत केल्यावर दिवाळी गोड करणारी मिठाई त्यांना देतेवेळी त्यांना सांगतात कि ऊन, वारा, पाऊस यांची पर्व न करता भारतमातेच्या रक्षणासाठी सीमेवर उभ्या असलेल्या तुमच्या घरातील सैनिकामुळेच आपण आनंदात दिवाळी साजरी करीत आहोत.आम्हाला तुमच्या कुटुंबाबद्दल अभिमान वाटतो. देशभक्तीने भरावलेल्या विचारांची देवाणघेवाण प्रत्येकाला 'उर्जादायी वाटते,
या छोट्याशा उपक्रमामुळे संपूर्ण गावातील वातावरण बदलून जाते. सैनिकांविषयीचा आदर वाढतो. सैनिक परिवाराला सन्मानाचे शब्द ऐकून शब्दातीत आनंद वाटतो ! समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करणारा हा कार्यक्रम असतो.यावेळी समस्त हिंदू आघाडी चे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे, आर्ट ऑफ लिव्हिंग चे अजित रणसिंग, वडनेर चे सरपंच नवनाथ निचित, निमगाव म्हाळुंगी चे सरपंच श्री बापूसाहेब काळे यांच्या तर्फे सैनिकांच्या कुटुंबीयांना टाकळी भिमाचे पोलीस पाटील श्री प्रकाश करपे, शिवसेना पुणे जिल्हा महिला उपाध्यक्ष अश्विनीताई जाधव,सामाजिक कार्यकर्ते प्रसिद्ध निवेदक आकाश वडघुले यांच्या शुभ हस्ते मिठाई वाटप करण्यात आली. यावेळी खंडू काळे, बाबुराव चौधरी, शिवराज पवार,आर्यन चौधरी, अथर्व चौधरी इत्यादी कार्यकर्त्यांनी सैनिकांच्या घरासमोर रांगोळी काडून दिवे लावून भारत मातेचा जयघोष करत होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन निमगाव म्हाळुंगी चे सरपंच बापूसाहेब काळे यांच्या नेतृत्वा खाली करण्यात आले असून सर्व कार्यकर्ते मनापासून सैनिकांच्या कुटुंबीयांची सेवा मनापासून करत असल्याने आणि सैनिकांचे कुटुंब आम्ही गेल्यावर आनंदी होऊन भारावून जात असल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आम्ही सर्वजण भारावून जात असल्याचे सरपंच बापूसाहेब काळे यांनी सांगितले,
भारताच्या सर्व सीमांवर शत्रू उभा असतो.भारतद्वेष्ट्या परकीय शत्रूंना रोखण्यासाठी प्रत्येक सीमेवर आपला देशभक्त सैनिक उभा असतो.हेच भारताचे सर्वात मोठे शक्तिस्थान असून सैनिक हेच खरे देशाचे 'हिरो' आहेत.