निपाणी प्रतिनिधी सागर श्रीखंडे
हजारो वर्षापासून संपूर्ण हिंदुस्थानभर घरोघरी नवरात्र बसते. रोज सकाळ संध्याकाळ पूजा पाठ, नैवेद्य, आरती करणे हा धर्माचार सर्वचजण पाळत असतात. पोराबाळांचा संसार सुखाचा समाधानाचा व्हावा यासाठी श्रीदुर्गामातेचा आशिर्वाद मागण्याची पद्धती आपण सर्वचजण प्रतिवर्ष पाळत आहोत. पण आपल्या देवी देवतांनी जेव्हा जेव्हा अधर्म वाढला अत्याचार वाढले त्या त्या वेळी शस्त्र हातात घेऊन त्याचा नायनाट केला आहे मात्र आपण हे विसरलो आहे
आपण फक्त भक्ती करून देवते कडे फक्त स्वतःसाठी मागतो पण देवी कडे एकच आहात आशीर्वादा च्या आहे तेवढाच पाहतो पण देवतेच्या इतर हातामध्ये शस्त्रे आहेत ते मात्र आपण विसरलो आहोत रामराज्य असो किंवा छत्रपती शिवरायांचे हिंदवी स्वराज्य असे यामध्ये स्त्रियांच्यावर कुठेच अत्याचार होत नव्हते पण आज स्वतंत्र भारतात आपली माता भगिनी सुरक्षित नाहीये हे दुर्दैव आहे यासाठीच प्रत्येक स्त्रियांनी शस्त्र ही शिकून आत्मसात करावे असे आव्हान श्री सद्गुरु तायक्वांदो अकॅडमी निपाणी चे बबन निर्मळ यांनी केले.
यावेळी बोलते वेळी म्हणाले की निपाणी आणी निपाणी ग्रामीण गावांमध्ये हिंदू हेल्पलाईन निपाणी चे प्रमुख आणि श्री विरूपाक्षलिंग समाधी मठाचे प.पू .प्राणलिंग स्वामीजी यांच्या विशेष प्रयत्नातून आज 25हून अधिक गावांमध्ये मोठ्या उत्साहात दुर्गा माता दौंड सुरू आहे प्राणलिंग स्वामीजी यांनी जो उदात्त हेतू घेवून गांव गावा फिरून हिंदूंना जग्रुत करत आहेत. आपण आजहि हाच उदात्त भाव अंतःकरणांत धारण करुन, प्रत्येकवर्षी नवरात्रांत श्रीदुर्गामातेचे पायाशी साऱ्या हिंदूच संघटन करण्यासाठी व ऐकता बनण्यासाठी आशिर्वाद मागण्याची म्हणजेच सामाजिक नवरात्र बसविण्याची प्रथा अंगिकारली पाहिजे, पत्करली पाहिजे.
हिंदु समाज कुटुंबासाठी म्हणून बसविलेले नवरात्र म्हणजेच श्रीदुर्गामातादौड होय असे मत यमगर्णी येथील दुर्गा माता दौंड मध्ये मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक दाखवते वेळी बबन निर्मळे यांनी व्यक्त केले
यावेळी निपाणी नंतर ग्रामीण भागात सर्व प्रथम दुर्गा माता दौंड यमगर्णी गावांमध्ये सुरू झाली आहे 20वर्षा पूर्वी पासून ही दुर्गा माता दौंड सुरू झाली होती आज य़ा दौंड ची स्वरूप मोठे झाले आहे सर्व गावकरी मोठ्या उत्साहात सहभागी होतात या दौंड मध्ये संपूर्ण गांवात रांगोळी,पाणी,आरती करून दुर्गा माता दौंड चे स्वागत केले जाते यामध्ये राष्ट्रभक्ती पर गीते जय घोष च्या माध्यमातून जग्रुति केली जाते,
यमगर्णी गावाच्या आदर्श घेवून आजूबाजूच्या गावात आज मोठ्या प्रमाणात दौंड सुरू आहे यावेळी मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक समर्थ निर्मले, सार्थक निर्मले, आरुषी बोधले, रूही बोधले, अवनी व्हदडी अर्णव बोरगावे वरद पठाडे, श्रीविराज मोहिते, लावण्या सावंत, पूर्वा साळुंखे, यांनी करून दाखवले यावेळी यमगर्णी मधील मोठ्या संख्येने हिंदू बांधव उपस्थित होते,