शिरोली बु येथे वन्य जीव सप्ताहात वन रक्षक रमेश खरमाळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Bharari News
0
जुन्नर प्रतिनिधी सचिन थोरवे 
         पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल शिरोली बुद्रुक (तालुका जुन्नर) येथे विद्यालयामध्ये वन्यजीव सप्ताह उत्साहामध्ये साजरा झाला .देश सेवेनंतर निसर्ग सेवा हाच त्यांचा वारसा .शिवनेर भूषण पुरस्कृत ,पर्यावरणासाठी इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड पर्यावरणासाठी या पुरस्काराने सन्मानित असे वनरक्षक श्री रमेश खरमाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .                    वन्यजीव संरक्षण काळाची गरज , प्लास्टिक बंदी ,निसर्गातील पशु पक्षी फुलपाखरे मधमाश्या एक निर्सगातील महत्वाचे दुवे त्यांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे , सेंद्रीय शेती करा . जुन्नर तालुका बिबटया प्रवण क्षेत्र आहे त्यामध्ये आपण कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे हे त्यांनी मुलांना समजावून सांगितले . विद्यालयाचे भूगोल विभाग प्रमुख श्री विरणक सर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली . आर एस पी विभाग ,राष्ट्रीय हरित सेना , इको क्लब वनराई व स्काऊट गाईड विभागा अंतर्गत कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले . विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ अनघा घोडके यांनी आभार मानले अशी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री प्रसाद हांडे सर यांनी माहिती दिली .
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!