सुनील भंडारे पाटील
शिरूर हवेली विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात संभाजी ब्रिगेडने चांगलीच कंबर कसली असून उमेदवार चंद्रशेखर घाडगे यांचा दांडगा जनसंपर्क पाहता विरोधकांना या निवडणुकीत घाडगे हे प्रभावी ठरणार आहेत अशी चर्चा सध्या नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे,
पुणे जिल्हा तसेच अंतर्गत सर्व तालुके यामध्ये घाडगे यांचे काम प्रभावी असून विशेषता शिरूर तसेच हवेली तालुक्यामध्ये आपल्या कार्याच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना न्याय मिळवून दिला आहे, जनतेचे सार्वजनिक प्रश्न याबाबत त्यांनी संभाजी ब्रिगेड च्या माध्यमातून अनेक वेळा आवाज उठवला आहे, सामाजिक धाडसी कामांमध्ये त्यांचा सहभाग अशी त्यांची सर्वत्र ख्याती आहे, जनतेच्या सेवेसाठी शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात जनतेची सेवा करण्यासाठी त्यांनी आता उमेदवारी जाहीर करत तोफ डागली आहे,
सद्यस्थितीत शिरूर तसेच हवेली तालुक्यामध्ये त्यांनी मतदारांशी संवाद साधत दांडगे वलय तयार केले आहे, नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, सामाजिक प्रश्नाविषयी, तसेच राजकारण याविषयी मुरब्बी ज्ञान असणाऱ्या शिरूर हवेली विधानसभेचे नवीन चेहरा असणारे उमेदवार म्हणून चंद्रशेखर घाडगे यांना चांगलीच पसंती मिळत आहे,