विधानसभा निवडणुकीपूर्वी जुन्नर पोलिसांची दमदार कामगिरी
गेले अनेक दिवसांपासून जुन्नर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अनेक नागरिकांचे मोबाईल चोरीला गेले असता त्यांनी जुन्नर पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार दिली होती.
या तक्रारीच्या अनुषंगाने जुन्नर पोलीस स्टेशनचे पी आय किरण अवचर यांच्या उपस्थितीत पोलीस केंद्रे यांनी सदर मोबाईल चे लोकेशन ट्रॅप करून हे मोबाईल तक्रारदारांना परत मिळून दिले आहे. हरवलेले मोबाईल जुन्नर पोलीस स्टेशनच्या सतर्क पोलीस यांच्यावतीने हे मोबाईल नागरिकांना परत मिळाल्यामुळे येथील नागरिकांचा पोलिसांवरती असलेला विश्वास देखील वाढला आहे.
सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या सूचनेनुसार जुन्नर डी वाय एस पी रवींद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण अवचर आणि पोलीस केंद्रे यांनी केली असून गर्दीचे ठिकाणी नागरिकांनी आपल्या मौल्यवान वस्तू आणि मोबाईलची काळजी घ्यावी असे आव्हान देखील त्यांनी केले आहे.