सुनील भंडारे पाटील
भिल्ल वस्तीतील मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबीयांची दिवाळी गोड होण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते व यश नर्सिंग होम हॉस्पिटलचे डॉ. चंद्रकांत केदारी यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक बांधिलकी जपत स्पर्श मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून लाडू,चिवडा,करंजी, शंकरपाळी,चकली,शेव,बालूशाही या दिवाळी फराळाचे किट बनवून वाटप करण्यात आले.
यावेळी स्वामी विवेकानंद फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गोरक्षनाथ क-हेकर डॉ.अमोल सोनटक्के, शिरूर तालुका कलाशिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रवीणकुमार जगताप,भगवान खुर्पे,दत्तात्रय माळी,आदी मान्यवर उपस्थित होते.हा समाजोपयोगी उपक्रम राबवण्यासाठी डॉ.राजेंद्र हार्दे, डॉ.अविनाश रुके,डॉ.श्रीकांत साकोरे,डॉ.विशाल व्यवहारे,डॉ.योगेश झुरुंगे महावितरणचे उपअभियंता नितीन महाजन यांनी सहकार्य केले.
यावेळी दत्तात्रय माळी यांनी सांगितले की,भिल्ल वस्तीपर्यंत कुठलीच मदत येत नाही त्यामुळे नागरिक मदतीपासून वंचित राहतात.परंतु आज प्रवीणकुमार जगताप सर यांच्या माध्यमातून दिवाळी सणाच्या निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते डॉ.चंद्रकांत केदारी यांनी स्पर्श मेडिकल फाउंडेशन यांच्या वतीने भिल्ल कुटुंबीयांना मिळालेल्या मदतीमुळे आमची दिवाळी गोड होणार आहे असे सांगितले,