राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकांच्या कारवाईत २४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Bharari News
0
सुनील भंडारे पाटील
                 विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ आदर्श आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क, पुणेच्या भरारी पथक क्र.१ आणि क्र. ३ यांच्याकडून अवैधरीत्या गावठी दारु निर्मिती, विक्री, वाहतूक आदी प्रकरणात कारवाई करुन ७१ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यामध्ये २३ लाख ९२ हजार ५० रुपये किंमतीचा दारू बंदी गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या पथकांमार्फत १५ ऑक्टोबरपासून अवैधरीत्या गावठी दारु निर्मीती, विक्री, वाहतुक, अवैध ताडी विक्री तसेच बेकायदेशीर देशी, विदेशी मद्य विक्री करणारे हॉटेल ढाबे आदी ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. या कालावधीत ७१ गुन्हे नोंदवून ६९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत दारुनिर्मितीचे रसायन ६ हजार ८०० लीटर, गावठी दारु २ हजार ६१६ लीटर, देशी दारु ४२५ ब.लीटर, विदेशी दारु २६२ ब.लि., बिअर ४५३ ब.लीटर, ताडी ९१० लीटर या मुद्देमालासह ६ चारचाकी व १ दुचाकी वाहन असा एकूण २३ लाख ९२ हजार ५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कारवाईत भरारी पथक क्र.१ व क्र.३ चे निरीक्षक देवदत्त पोटे, दुय्यम निरीक्षक डी. एस. सूर्यवंशी, पी.ए. कोकरे, वाय. एम. चव्हाण, पी.ए. ठाकरे तसेच सहाय्यक दुय्यम निरीक्षक आदींनी भाग घेतला. 

भरारी पथका मार्फत कार्यक्षेत्रात तात्पुरते तपासणी नाके सुरु करण्यात आले असून अवैध मद्य वाहतूकीवर नजर ठेवण्यात येत आहे. यापुढे देखील आचारसंहिता कालावधीत अवैध मद्य विक्री, वाहतूक ठिकाणी पाळत ठेवून कारवाई सुरु राहील. अवैध मद्य निर्मिती, विक्री वाहतूक बाबत कोणास माहिती मिळाल्यास तात्काळ राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, पुणे विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पथकाचे निरीक्षक पोटे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे,
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!