फ्रेंड्स एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचालित फ्रेंड्स नर्सरी प्रायमरी सेकंडरी स्कूल कोरेगाव भीमा (तालुका शिरूर) चे ३१ वे वार्षिक स्नेहसंमेलन थाटामाटात संपन्न झाले.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे अण्णासाहेब मगर सहकारी बँकेचे चेअरमन माननीय श्री नंदकुमार विठोबा लांडे साहेब तसेच
माजी पीएसआय बापूसाहेब हंबीर, विद्यमान सरपंच संदीप ढेरंगे,माजी सरपंच विजय गव्हाणे.माजी सरपंच अमोल गव्हाणे कोरेगाव ग्रामपंचायत चे सदस्य महेश ढेरंगे ,ग्रामपंचायत सदस्य शरद ढेरंगे, संस्थेचे अध्यक्ष राजाराम ढेरंगे, सचिव दिलीप भोसले ,उपाध्यक्ष प्रकाश खैरमोडे , खजिनदार डॉ.संजय पाटील , रामदास सव्वाशे, राजेंद्र गव्हाणे ,शंकर गव्हाणे, सुनील दुगड , जयकांत देशमुख, उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे नंदकुमार लांडेसाहेब यांनी संस्थेने आतापर्यंत केलेल्या कामकाजाची प्रशंसा केली आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. राजाराम ढेरंगे यांनी आपल्या भाषणामध्ये संस्थेच्या आगामी उपक्रमाची माहिती दिली.विजय गव्हाणे आणि महेश ढेरंगे यांनी यावेळेस आपली मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
३१ व्या वार्षिक स्नेहसंमेलनमध्ये नर्सरी प्रायमरी आणि सेकंडरी विभागातील विद्यार्थ्यांनी समूहनृत्य, देशभक्तीपर गीते, भारुड, जागरण गोंधळ, सोशल मीडियाचा समाजावर होणारा परिणाम , शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका , दिवंगत मराठी कलावंतांची आठवण म्हणून त्यांची जुनी गाणी असे विविध कार्यक्रम सादर केले.
संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नर्सरी विभागातील प्रमुख निमा गव्हाणे त्यांचे सर्व सहकारी तसेच प्रायमरी विभागातील प्रमुख वैशाली वाळुंज आणि वैशाली धर्माधिकारी आणि त्यांचे सर्व सहकारी शिक्षक तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती सैंदाणे आणि उपमुख्याध्यापिका अजिताकुमारी नायर आणि त्यांचे सर्व सहकारी शिक्षक शिक्षिका यांनी शाळेचे नियोजनाखाली मेहनत घेऊन यशस्वी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती सैंदाणे यांनी केले तर आभार संस्थेचे सचिव दिलीप भोसले यांनी मानले.