पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतून इंद्रायणी नदीत थेट मैला मिश्रित सांडपाणी आणि उद्योगाचे केमिकल रसायन मिश्रित दूषित पाणी थेट इंद्रायणी नदीत येत असल्याने तीर्थक्षेत्र आळंदीत इंद्रायणी नदी पुन्हा फेसळली असून नदी प्रदूषण वाढल्याने आळंदीत भाविक, नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
नदी प्रदूषण रोखण्यासाठी उपाय योजना आवश्यक असल्याने नदी प्रदूषण मुक्त व्हावी अशी मागणी आळंदीतून जोर धरत आहे. आळंदीतील कीर्तनकार चिदंबरेश्वर साखरे, तुकाराम महाराज ताजने, विश्वकर्मा महाराज पांचाळ, पुयड महाराज, दिलीप महाराज ठाकरे, कृष्णाजी डहाके आदीसह नागरिक भविकांतून नाराजी व्यक्त होत असून त्यांनी इंद्रायणी प्रदूषण मुक्त व्हावी अशी मागणी केली आहे.