कामटवाडी ता.दौड येथे रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

Bharari News
0
यवत प्रतिनिधी नवनाथ वेताळ
                दौड तालुक्यातील कामटवाडी येथे रात्री रेल्वेच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू झाला आहे.
अलिकडच्या काही दिवसात बिबट्याचा वावर नागरी वस्तीत वाढलेला दिसुन येत आहे. दौड तालुक्यातील बहुतांश गावा मध्ये मोठया प्रमाणात ऊसाचे उत्पन्न घेतले जाते, त्यामुळे जंगली प्राण्यांचा वावर या भागात जास्त आहे. वन विभाग अनेक ठिकाणी पिंजरे लावतात परंतू त्यात बिबट्या सारखे जंगली प्राणी अडकण्याचे प्रमाण खूपच कमी आहे.
जंगली प्राणी शिकारीच्या शोधात नागरी वस्तीत शिरकाव करु लागले आहेत, गावातील पाळीव प्राण्यांवर, माणसांवर हल्ला करत आहे.
            आज सकाळी कामटवाडी मधील नागरीकांना मृत बिबट्याचे दर्शन झाले रेल्वेच्या धडकेने बिबट्याचे अनेक अवयव शरीरापासून वेगळे झालेले दिसुन येत होते. येरवी बिबट्याचा परिसरातील वावरा मुळे नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण पसरते आज तेच नागरीक मृत बिबट्याचा जवळ जाऊन फोटो टिपताना दिसुन येत होते. 
बिबट्याच्या शरीरावरून त्याचे अंदाजित वय दहा वर्ष इतक असेल आणि वयस्कर आहे असे दिसून येत आहे. यवत रेल्वे स्टेशन प्रबंधक अधिकारी यांनी ही बाब वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले त्यानंतर वनविभागाचे वनरक्षक अधिकारी शिवकुमार बोंबले घटनास्थळी दाखल झाले व सदर घटनेचा पंचनामा केला आणि वनरक्षक अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत झालेल्या बिबट्याचे दहन करणार असल्याचे त्यांच्याकडून समजले.
          तसेच सदर ठिकाणी कामटवाडी गावाचे पोलीस पाटील सौ.ज्योती सुभाष भिसे यादेखील घटनास्थळी उपस्थित होत्या त्यांनी आमच्याशी बोलताना सांगितले की कामटवाडी आणि परिसरातील नागरिकांनी आपल्याकडील पाळीव प्राण्यांचे संरक्षण करून तसेच रात्रीच्या वेळेस बाहेर न फिरता सतर्क राहण्यास सांगितले आहे, तसेच बाहेर फिरताना बॅटरी , काठी तसेच सोबत अजून एक जोडीदार असे बाहेर पडावे एकट्याने बाहेर न पडणे तसेच रात्रीच्या वेळेस आपल्या जवळील पाळीव प्राणी यांना सुरक्षित ठिकाणी ठेवणे, आणि कोणालाही आजूबाजूच्या परिसरामध्ये बिबट्या किंवा जंगली प्राणी आढळल्यास तात्काळ गावातील नागरिकांना कळवणे तसेच वन विभागाला याची कल्पना त्यांच्या हेल्पलाइन नंबर वरून देणे, सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन कामटवाडी पोलीस पाटील.ज्योती सुभाष भिसे यांनी यावेळेस केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!