शिक्रापूर (तालुका शिरूर) येथे शिक्रापूर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच यांच्यावर एकाने धारदार शस्त्राने प्राण घातक हल्ला करून खून करण्यात आला आहे, या घटनेने शिक्रापूर परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण तयार झाले आहे, घटनास्थळी शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने धाव घेतली व परिस्थिती आटोक्यात आणल,
सद्यस्थितीत पुणे जिल्ह्यामध्ये खून मारीमारी च्या घटनेमध्ये वाढ होऊ लागली आहे, कायद्याची तसेच पोलिसांची भीती व धाक कुठल्याच प्रकारचा लोकांना राहिलेला नाही, अशा घटनेला आळा घालण्यासाठी पोलीस खात्याने आता कठोर पावले उचलण्याची गरज आहे, शिक्रापूर येथील माजी सरपंच दत्ता गिलबिले यांच्या घराजवळ एका मध्यम वईन इसमाने धारदार शस्त्राने गिलबिले यांच्या मानेवर वार केले असून त्यात त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे,
संबंधित घटनेने शिक्रापूर तसेच आसपासच्या गावात खळबळ उडाली आहे, हल्ल्या मागील कारण सध्या अस्पष्ट आहे, घटनेचे गांभीर्य पाहता शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या वतीने तातडीने पावले उचलून घटनास्थळी तपासीय पथक रवाना करण्यात आले आहे, अशी माहिती शिक्रापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी दिली आहे,