निमगाव म्हाळुंगीचे सरपंच काळे यांनी युवक युवतींना घडविले मोफत रायगड दर्शन

Bharari News
0
शिरूर प्रतिनिधी
              शिवराज्य प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य, अनुलोम संस्था,भाजपा मन कि बात उत्तर पुणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले रायगड दर्शन चे आयोजन निमगाव म्हाळुंगी चे सरपंच तथा शिवराज्य प्रतिष्ठाण चे अध्यक्ष बापूसाहेब काळे यांच्या तर्फे करण्यात आले ,

              सदर आयोजणाचे निमित्त होते महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदी मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब तर उपमुख्यमंत्री पदी मा. ना. एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांची निवड झाल्या बद्दल तसेच कोथरूड च्या आमदार पदी मा. ना. चंद्रकांतदादा पाटील,शिरूर हवेली च्या आमदार पदी ज्ञानेश्वरआबा कटके, कसबा च्या आमदार पदी हेमंतजी रासने, भोसरी च्या आमदार पदी महेशदादा लांडगे, दौंड च्या आमदार पदी राहुलदादा कुल,पर्वती च्या आमदार पदी माधुरीताई मिसाळ आणि शिवाजीनगर च्या आमदार पदी सिद्धार्थदादा शिरोळे हे आमदार पदी निवडून आल्याबद्दल सदर दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

                    किल्ले रायगड दर्शन यात्रेच्या निमित्ताने दिलीप चव्हाण, मनोहर चव्हाण, दादासाहेब घोरपडे,नामदेव काळे, शिवाजी चौधरी,शरद दोरगे, शंकरराव चव्हाण,रेश्मा काळे,ताई दोरगे, सौ मनोहर चव्हाण,किरण काळे, आर्यन चव्हाण, शिवराज पवार,युवराज चव्हाण यांचे विशेष सहकार्य लाभले.
गावातील युवक युवतींनी छत्रपती शिवाजी महाराज यांची सामूहिक शिववंदना घेऊन किल्ले रायगड दर्शनासाठी रात्री साडेअकरा वाजता निघाले. 

                 किल्ले रायगड वर पहाटे साडेपाच वाचता पोहचल्यावर सर्वांनी पायी किल्ला चढण्याचा निर्णय घेऊन आनंद घेतला. किल्ला चढत असताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. सर्वजण किल्ले रायगड दर्शना साठी आलेले असल्याने सर्वांचा उत्साह ओसंडून वाहत होता.किल्ल्यावरती जाण्यासाठी असलेला एकमेव मार्ग “महा-दरवाजा” मधून आम्ही सर्वजण आत गेलो.

             रायगड किल्ल्यावरती एक मानवनिर्मित असणारे तळे पाहिले ज्याचे नाव “गंगासागर तलाव”आहे ते पाहिले.तसेच किल्ल्यामध्ये असलेल्या राज्याच्या दरबारात एक सिंहासनाची प्रतिकृती असून ती नगारखाना दरवाज्याकडे तोंड करून ठेवली आहे. सिहासनाजवळील भाग ध्वनीलहरीसाठी अशा पद्धतीने बनवला गेला आहे कि दरबारातील दरवाजाच्या इथे बोललेले शब्द सिंहासनापर्यंत सहजरीत्या ऐकू येऊ शकतात. रायगड किल्ल्यावरती उंच दरीवरती बांधलेला एक प्रसिद्ध बुरुज असून त्याला “हिरकणी बुरूज” असे अशी काही अंगावर काटे आणणारे ठिकाणे या सर्वांनी अनुभवली.

                त्याच प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी, वाघ्या कुत्रा यांची समाधी, होळीचा महाल,किल्या वरील बाजाराची रचना,जगदीश्वराचे मंदिर,अशा स्वरूपाची अविस्मरणीय ठिकाण त्या ठिकाणी यांना पाहायला मिळाली.तसेच किल्ला उतरल्यानंतर आम्ही सर्व जण पाचाड येथील राजमाता माँ साहेब जिजाऊंच्या समाधी स्थळी दर्शन जाऊन दर्शन घेतले व तेथून पुढे पुन्हा गावाकडे परतीचा प्रवास सुरु केला.यावेळी सरपंच बापूसाहेब काळे यांनी किल्ले रायगड दर्शनासाठी आलेल्या सर्व युवक युवतींचे तसेच वय वर्षे 65 असणाऱ्या गावातील शंकरराव चव्हाण यांनी किल्ला पायी चढल्या बद्दल कौतुक करून आभार मानले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!