वाडेबोल्हाईतील वाडेगाव (तालुका हवेली) येथील पठारे वस्ती मध्ये वाडेगाव-केसनंद रोडलगत असलेल्या मारुती(बापू) ठवरे यांच्या घराशेजारी असलेल्या बकरी शेळ्यांच्या वाड्यात कंपाऊंड जाळी वाकवून बिबट्याने चोर पावलांनी शिरून शेळी,बकऱ्यांवर प्राणघातक जीवघेणा हल्ला केला असून एकूण ११ शेळ्यांची करडे मृत्युमुखी तर तीन करडे जखमी झाली आहेत,
यामध्ये ठवरे यांचे जवळपास दीड लाखापेक्षा जास्त नुकसान झाले असून विभागाने त्याप्रकरणी योग्य तो पंचनामा करून नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी अशी विनंती या ठिकाणी ग्रामस्थ आणि ठवरे कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे, वैभव पठारे अतुल उंद्रे, अक्षय गायकवाड, पार्थ गाडेकर या ग्रामस्थांनी घटनास्थळी लगेच भेट देऊन चौकशी केली असता गेल्या आठ ते दहा दिवसापासून केसनंद, आव्हाळवाडी, मांजरी या परिसरामध्ये बिबट्या दिसल्याचे अनेक नागरिकांना निदर्शनास आले आहे,
तशी माहितीही त्यांनी वनखात्याला कळवली होती, त्यानंतर मांजरी परिसरामध्ये दोन शेळीच्या पिल्लांवर बिबट्याने हल्ला करून त्यांना ठार मारले होते, आठ दिवसांपूर्वी ठवरे यांच्या शेजारील दादा केसकर यांच्या गरोदर मेंढी हल्ला करून तिला ठार मारण्यात आले होते त्यामुळे मांजरी, वाडेगाव, न्हावी सांडस, शिरसवडी या परिसरामध्ये अनेक बिबटे असल्याचे सिद्ध झाले आहे,
परिसरातील बिबट्यांचे प्रमाण वाढले असून अनेक बिबटे परिसरामध्ये वावरत आहे बिबट्याने काल वाडेगाव येथे हल्ला करून उच्छाद मांडला आहे, तरी यापुढील काळात मनुष्यहानी सारखे अनर्थ टाळण्यासाठी वन खात्याने योग्य ती खबरदारी घेऊन परिसरामध्ये पिंजरा लावणे अत्यंत गरजेचे आहे तसेच या पुढील काळात यापेक्षा जास्त मोठे नुकसान होऊ नये याकरिता वन खात्याने योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन येथील माजी सरपंच कुशाभाऊ गावडे, माजी उपसरपंच संजय भोरडे, वैशाली चंद्रकांत केसवड सरपंच वाडेगाव, जगन्नाथ ढवळे,सोपानकाका गावडे, ग्रामपंचायत सदस्य नंदू भोर, निळकंठ केसवड, लालासाहेब गावडे, ज्ञानेश्वर गावडे, माजी उपसरपंच बाळासाहेब केसवड, आप्पा गावडे आणि ग्रामस्थांनी वन खात्याला केले आहे.
बिबट्याने हल्ला केल्याच्या पार्श्वभूमीवर वनखात्याचे वनरक्षक रासकर वनसेवक बाजारे यांनी परिसरामध्ये त्वरित पिंजरा लावण्यात येईल असे आश्वासन दिले आहे