सुनील भंडारे पाटील
वढू खुर्द (तालुका हवेली) येथे बागवान वस्तीवर बिबट्याचे वास्तव्य असून गेल्या आठवड्यापासून वस्तीवरील घरासमोरील पाळीव कुत्र्यांची शिकार हा बिबट्या करत आहे, आज सकाळी पहाटे किरण भांडवलकर यांचे पाळीव कुत्र्याची बिबट्याने शिकार केली,
भीमा नदीच्या तीरावर हवेली तालुक्या च्या हद्दीत असणाऱ्या वढू खुर्द गावामध्ये उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून बिबट्याला लपण्यासाठी अनुकूल जागा आहे, आसपासच्या परिसरातील गावात देखील बिबट्याचा वावर असून हे बिबटे आता मानवी वस्तीत देखील दिसू लागले आहेत, गेल्या आठवड्यापासून संबंधित वस्तीत पाळीव तीन ते चार कुत्री नाहीशी झाली असून आज सोमवार तारीख 2 रोजी सकाळी 6 वा बागवान वस्तीवर राहण्यास असणाऱ्या किरण भांडवलकर यांच्या पाळीव कुत्र्याचा ओरडण्याचा आवाज आला, कुत्र्याची शोधा शोध केली असता दिशेनासे झाले, त्यानंतर सकाळी शोध घेतला असता,
घरा पाठीमागील उसामध्ये कुत्रे मेलेल्या अवस्थेत सापडले, मुलांनी अनोखी शक्कल चालवून बिबट्या अर्धवट खाल्लेले कुत्रे खाण्यासाठी परत येतो की काय हे पाहण्यासाठी मुलांनी झाडाला सीसीटीव्ही कॅमेरा लावला, दुपारी साडेबाराच्या सुमारास हा बिबट्या अर्धवट खाल्लेले कुत्रे खाण्यासाठी पुन्हा त्या ठिकाणी आला, त्याचा फोटो या बातमीसोबत जोडला आहे,
बिबट्याच्या सततच्या वावरामुळे परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले असून वन विभागाने तातडीने पिंजरा लावून या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरी करत आहेत,