वंचित बालकांच्या शिक्षण हक्कासाठी वर्षानुवर्षे संघर्ष व विकासात्मक कार्य करत असलेल्या संतुलन संस्थेने नाताळ सनाच्या औचित्यने वाघोलीतील गोरेवस्ती येथे संतुलन पाषाण शाळेतील विद्यार्थाचे वार्षिक सम्मेलनाचे आयोजन करण्यात आले.
सम्मेलनाचे उदघाटण संतुलन संस्थेच्या संस्थापक संचालिका अँड. पल्लवी रेगे यांच्या हस्ते करण्यात आले. शिक्षण हाच प्रगती व शोषण मुक्तीचा मार्ग असून शिक्षण वंचित घटकातील शाळा बाह्य मुलांसाठी संस्थेने राज्यात दगडखाण क्षेत्रात व रस्यावरील मुलांसाठी पाषाण शाळा सुरू केल्या. एकाबाजुने हजारो बालकांना शिक्षणाच्या मुळ प्रवाहात आणने व दुसऱ्या बाजुने स्थलांतरीत बालकांच्या शिकण हक्कासाठी शासनाकडे धोरणात्मक निर्णयांसांठी लढा उभारण्याचे कार्य अविरहत चालू आहे. बालकांचा आत्म विश्वास, धाडस, बौद्धिक क्षमता व मुल्य शिक्षणाची गुणवता उंचावण्यासाठी शिक्षक व पालक वर्गाने कायम तत्पर राहण्याचे प्रतिपादन अँड रेगे यांनी केले.
संतुलन पाषाण शाळेतील शिक्षणकार्यात सहकार्य करणाऱ्या ज्येष्ठ महिला अक्कासाहेब नलावडे, संदिप मोरे, मर्याप्पा चौगुले, प्यारेलाल जाठाव, लक्ष्मण पेठकर, कांतांबाई पवार, हतागळे मावशी, अंजनाताई वेताळ, शिवाजी पात्रे आदींचा विषेश सन्मान करण्यात आला.
कार्यक्रम प्रसंगी विविध स्पर्धा गुणानुक्रम काढून विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. यात प्रामुख्याने नृत्य भाषण गीत गायन व नाटिका यांचा समावेश केला. परीक्षक म्हणून अश्विनी मुरेकर, प्रगती रेगे, रजनी गारगी व अंजना वेताळ यांनी काम पाहिले. नृत्य या कलाविष्कारात प्रथम क्रमांक गाडीतळ, द्वितीय क्रमांक सुयोग नगर व तृतीय क्रमांक वाघेश्वर नगर यांनी पटकाविला. भाषणामध्ये वाघेश्वर नगरचा पियुष गुंजाळ प्रथम तर तुळजाभवानी नगरचा योगेश चव्हाण याने द्वितीय क्रमांक मिळविला. गीत गायनामध्ये अनुक्रमे कलावती काळे आणि ग्रुप गोरे वस्ती, सिद्धार्थ सोरटे आणि ग्रुप वाघेश्वर नगर, यश मालखेडे आणि ग्रुप तुळजाभवानी नगर यांनी बक्षिसे मिळविली. येशू जीवनावर आधारित नाटिकेमध्ये प्रथम सुयोग नगर, द्वितीय गोरे वस्ती तर तृतीय क्रमांक वाघेश्वर नगर यांना मिळाला.
प्रथम सत्र परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना विशेष गिफ्ट देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी प्रमुख मान्यवरासह मोठ्या प्रमाणावर पालक, कामगार उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी पालक व कामगार वर्गास ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आदिनाथ चांदणे, पांडुरंग भालेराव, फिरोज शेख, दिपाली कोल्हे, अश्विनी पात्रे, वैशाली वडोदे, स्नेह प्रभा चांदणे, शामल पवार, सुनिता गायकवाड, संतोषी भू आर्य, दीपक जॉन व सोनी जॉन यांनी परिश्रम घेतले.