आळंदीत सफला एकादशी हरिनाम गजरात साजरी

Bharari News
0
आळंदी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर 
                 श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात भाविकांची सफला एकादशी निमित्त श्रींचे दर्शनास गर्दी झाली होती. आळंदी सफला एकादशी निमित्त वारकरी भाविकांनी दिंड्या दिंड्यातून हरिनाम गजरात पायी नगर प्रदक्षिणा केल्या. 

             या मध्ये एक श्वान देखील मोठ्या रुबाबात एका दिंडीच्या पुढे हरीनाम गजर सुरू असताना पुढे चालत होता. माऊली मंदिरात लक्षवेधी पुष्प सजावट सफला एकादशी निमित्त भाविकांची दर्शनासाठी हरिनाम गजरात गर्दी. मंदिर व नगरप्रदक्षिणा करीत भाविकांनी एकादशी साजरी केली. 

             परंपरेने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम, पवमान पूजा, आरती, महानैवेद्य झाला. एकादशी निमित्त होणारे परंपरेचे कार्यक्रम देखील हरिनाम नजरात झाले. यावेळी जास्तीत जास्त भाविकांना कमीत कमी वेळेत सुखकर दर्शन देण्याची नियोजन व्यवस्थापक माऊली वीर यांनी केले. मंदिरात प्रसाद वाटप परंपरेने झाला. भाविकांनी दिंडी, दिंडीतून नगरप्रदक्षिणा केल्या. व्यवस्थापक माऊली वीर यांनी नियोजन केले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!