राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने शहर अध्यक्ष जयदेव इसवे यांच्या हस्ते संविधान निर्माते परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली, आपल्या आयुष्यात मनुवादी संकटांचा बाबासाहेबांनी धीराने सामना केला,
अनिष्ट रूढी, प्रथा,परंपरा यांचा कडाडून विरोध केला व ते संपवण्यासाठी काळाराम मंदिर, महाड चा सत्याग्रह अशी अनेक जन आंदोलन उभी केली आणि समाजाला माणूस म्हणून जगायचं असेल तर या रूढी परंपरा त्यागून शिक्षणाची कास धरावि लागेल असे ठणकावून सांगितले आपण स्वतः शिक्षणात अनेक विषयांत पी एच डी सह मोठ मोठ्या डिगऱ्या संपादित केल्या व समाजासमोर आदर्श निर्माण करून दिला ,
अशा या महान जगविख्यात कायदे पंडित डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सामाजिक न्याय विभागाचे विनम्र अभिवादन त्या प्रसंगी सामाजिक चे पुणे शहर अध्यक्ष जयदेव आहिलू इसवे, निरीक्षक डॉ. गौतम पिसे, सरचिटणीस श्रीमती पूनम सोनावणे,विधानसभा अध्यक्ष कोथरूड अमित तुरूकमारे, हडपसर वामन धाडवे, कार्याध्यक्ष नामदेव उपाडे, काँटोंमेंट अतुल जाधव, कसबा शुभम शिंदे, पर्वती कुमार खंडागळे, खडकवासला प्रविण भोसले, छ.शिवाजी नगर युवराज जेठीथोर, संघटक सचिव अविनाश येणपुरे,सचिव राजू गुडेकर, प्रा अशोक नाळे, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पोटे, उपाध्यक्ष नितीन कडू, विनायक जाधव, प्रकाश वैराळ, विक्रम मोरे, मिनाक्षी ताई कांबळे, सुखदेव आबनवे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते